Chinmay Sutar : मुंबईच्या मुलाची कमाल, आधी 400 धावा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता ऑस्ट्रेलियन खेळाडूचा 100 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला

Chinmay Sutar : मुंबईने एक चांगला खेळाडू गमावला असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही. मुंबईकडून संधी मिळत नव्हती म्हणून त्याने दुसऱ्या राज्याकडे मोर्चा वळवला. आता तिथून खेळताना तो प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पाडतोय.

Chinmay Sutar : मुंबईच्या मुलाची कमाल, आधी 400 धावा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता ऑस्ट्रेलियन खेळाडूचा 100 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
Chinmay Sutar
Image Credit source: instagram
| Updated on: Oct 29, 2026 | 8:25 PM

रणजी ट्रॉफी मध्ये महाराष्ट्राचा एक खेळाडू कमालीचं प्रदर्शन करतोय. चिन्मय सुतारच रणजी मध्ये जबरदस्त प्रदर्शन सुरु आहे. चिन्मय 29 वर्षांचा आहे. आधी त्याने 400 धावा फटकावल्या होत्या.आता त्याने पुन्हा एक शतक ठोकलं आहे. मुंबई किंवा महाराष्ट्राच्या टीममधून संधी मिळत नसल्याने त्याने आपला मोर्चा मिझोरमकडे वळवला. मिझोरमकडून खेळताना त्याने मेघालय विरुद्ध 125 धावा फटकावल्या. त्याचं हे सलग दुसरं शतक आहे. सुतारने 215 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 125 धावा केल्या. त्याचसोबत त्याने पहिल्या चार प्रथम श्रेणी इनिंगमध्ये एकूण 659 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या विल पॉन्सफोर्डचा 100 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. पॉन्सफोर्डने सुद्धा आपल्या पहिल्या चार इनिंगमध्ये 616 धावा केल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी चिन्मय सुतार रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील कायम लक्षात राहिल अशी इनिंग खेळला होता. नागालँड विरुद्ध सामन्यात एकाच इनिंगमध्ये त्याने 400 धावा ठोकल्या होत्या. त्याने 517 चेंडूत 46 चौकार आणि सात सिक्स मारले होते. रणजी ट्रॉफीमध्ये 400 धावा करणारा तो दुसरा फलंदाज बनला आहे. महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकरांनी 1948-49 च्या सीजनमध्ये काठियावाड विरुद्ध नाबाद 443 धावा केल्या होत्या. रणजी ट्रॉफीमधील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. रणजी ट्रॉफीमधील आजपर्यंतची ही सर्वाधिक धावसंख्या आहे. चिन्मय सुतार प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात 400 धावा करणारा दहावा फलंदाज आहे. या लिस्टमध्ये ब्रायन लारा, डॉन ब्रॅडमन आणि पॉन्सफोर्ड सारखे मोठे प्लेयर आहेत.

Loading...

रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

सुतारचा इथपर्यंतचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. तो मूळचा मुंबईचा फलंदाज आहे. त्याने इथल्या स्थानिक क्रिकेटमध्ये नाव कमावलं होतं. मुंबईत टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला नियमित संधी मिळत नव्हती. म्हणून 2026-27 च्या सीजनमध्ये त्याने रणजी क्रिकेट खेळण्यासाठी मिझोरमची निवड केली. मिझोरमने त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली. त्याने थेट रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करुन याचं उत्तर दिलं आहे. तो मुंबईसाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा खेळला आहे.

99 रन्सवर तो आऊट झालेला

चिन्मय सुतारने मणिपूर विरुद्ध 35 आणि 99 धावा करुन आपल्या प्रथम श्रेणी करिअरची सुरुवात केली होती. 99 रन्सवर तो आऊट झालेला. शतकाची त्याची संधी हुकलेली. त्यानंतर त्याने नागालँड विरुद्ध इतिहास घडवला आणि आता मेघालय विरुद्ध योगदान दिलय. नागालँड विरुद्ध एकाच डावात 400 धावा करताना चिन्मय सुतारने ललरेमपुइया छकछुआक सोबत मिळून शेवटच्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us