IND vs ENG: हातात मॅच होती पण एक चूक भारताला महाग पडली, पराभावामागे तो एकटा जबाबदार; व्हिलन कोण?

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा टी-20 सामना काल रंगला जो इंग्लंडने जिंकला. आता भारतीय संघाच्या या पराभवामागे एक गोष्ट कारणीभूत ठरली.

IND vs ENG: हातात मॅच होती पण एक चूक भारताला महाग पडली, पराभावामागे तो एकटा जबाबदार; व्हिलन कोण?
ind vs eng 2nd t20
| Updated on: Jul 05, 2026 | 8:18 AM

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा टी-20 सामना इंग्लंडने जिंकला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 190 धावा केल्या. तर इंग्लंडच्या संघाने 19 षटकांतच 191 धावा केल्या. कालच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली आणि ती म्हणजे वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. वैभवचे पदार्पणही भारतीय संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. कालचा सामना भारतीय संघाने एका कारणामुळे गमावला. भारतीय संघाच्या पराभवामागे कोण व्हिलन ते पाहा…

इंग्लंडने ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 4 गडी राखून जिंकला. या विजयासह इंग्लंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यजमान संघाच्या विजयाचा नायक जेकब बेथेल होता, ज्याने 76 धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 धावा केल्या. इंग्लंड संघाने 19 षटकांत विजय मिळवला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.

Loading...

16 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 5 गडी बाद 142 होती. जेकब बेथेल 36 चेंडूंमध्ये 42 धावा करून खेळत होता. सॅम करन त्याच्यासोबत क्रीजवर होता. 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 49 धावांची गरज असताना, रवी बिश्नोई 17वे षटक टाकण्यासाठी आला. बिश्नोईने पहिल्याच चेंडूवर नो-बॉल टाकला. त्याचा पुढचा पाय रेषेच्या बाहेर नव्हता, पण त्याचा मागचा पाय रिटर्न क्रीजला स्पर्श करत होता. यामुळे पंचांनी नो-बॉल घोषित केला.

जेकब बेथेलने फ्री हिटवर षटकार मारला. बिश्नोईने पुढच्याच चेंडूवर नो बॉल टाकला, पण तो पुन्हा बॅकफूट नो-बॉल होता. यावेळी बेथेलने फ्री हिटवर षटकार मारला. त्याने पुढच्या चार चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार मारून एकूण 14 धावा केल्या. यामुळे 17 व्या षटकात 29 धावा झाल्या. संघासमोर शेवटच्या 18 चेंडूंमध्ये केवळ 20 धावांचे लक्ष्य होते, जे अवघड नव्हते. रवी बिश्नोई टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला आहे. हे भारताचे एकूण तिसरे सर्वात महागडे षटक आहे. शिवम दुबेने 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 34 धावा दिल्या होत्या. स्टुअर्ट बिन्नीने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 32 धावा दिल्या होत्या. रवी बिश्नोईच्या आधी, सुरेश रैना हा टी-20आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारा भारतीय फिरकी गोलंदाज होता. त्याने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २६ धावा दिल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us