AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी

भारत इंग्लंड टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. या सामन्यात भारताने 190 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंडने जेकेब बेथेलच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर गाठवलं.

IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी
IND vs ENG, 2nd T20: इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडीImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 04, 2026 | 10:41 PM
Share

भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमनेसामने आले होते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न होता. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडन 4 गडी राखून हे आव्हान पूर्ण केलं. यासह पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.  कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात हा तिसरा पराभव आहे.

इंग्लंडचा डाव

भारताने विजयासाठी दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्या षटकात इंग्लंडला दोन धक्के बसले. फिलिप सॉल्ट आणि जोस बटलर खातं न खोलता बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी हॅरी ब्रूक आणि जेकब बेथेल यांनी 50 धावांची भागीदारी केली. हॅरी ब्रूक 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉम बँटन आणि जेकब बेथेल यांची भागीदारी जमली. पण 39 धावांवर टॉम बँटन बाद झाला. विल जॅक्सही 9 धावांवर असताना बाद झाला. एका बाजूने जेकब बेथेल विजयासाठी झुंज देत होता. त्याची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली. जेकेब बेथेलने रवि बिष्णोईच्या षटकात पुरेपूर लाभ घेतला. नो बॉलनंतर सॅम करनने एक धाव घेतली आणि बेथेलला स्ट्राईक मिळाली. त्यानंतर त्याने बिष्णोईची धुलाई करत त्यात आणखी 27 धावा जोडल्या आणि एका षटकात 29 धावा आल्या. त्यामुळे सामना फिरला.

भारताचा डाव

भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. वैभव 14 दावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्यातील भागीदारी फक्त 15 धावांची झाली अभिषेक शर्मा 43 धावांवर बाद झाला. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. यांनी तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 65 धावा केल्या. श्रेयस अय्यर 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करून परतला. इशान किशनचं अर्धशतक फक्त एका धावेने हुकलं. तर अक्षर पटेल 2 धावांवर असताना धावचीत झाला. हार्षित राणाही 6 धावांवर बाद झाला. तिलक वर्मा नाबाद 24 धावांवर राहिला.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...