AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट नाही तर मला कर्णधार बनवणार होते पण ऐनवेळी… पार्थिव पटेलचा खळबळजनक खुलासा, काय घडलं?

विराट कोहलीकडे आरसीबी संघाचे कर्णधार पद होते. पण ते पद पार्थिव पटेलला मिळणार होते पण मग तसे का झाले नाही यामागचे कारण जाणून घ्या...

विराट नाही तर मला कर्णधार बनवणार होते पण ऐनवेळी... पार्थिव पटेलचा खळबळजनक खुलासा, काय घडलं?
| Updated on: Oct 09, 2026 | 1:00 PM
Share

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा खेळाडू पार्थिव पटेलने एक गोष्ट बोलून दाखवली आहे. ही गोष्ट विराट कोहली आणि आरसीबीशी निगडीत आहे. पार्थिव पटेल यांच्या विधानाने मात्र एकच खळबळ उडाली आहे. पार्थिव पटेलने विराट कोहलीला आरसीबीचा कर्णधार बनवणार नव्हते असा मोठा खुलासा केला आहे.

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये पार्थिव पटेलने खुलासा केला की, “आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांनी मला सांगितले होते की मी विराटची जागा कर्णधार म्हणून घेईल.” नेहरा २०१८ आणि २०१९ मध्ये आरसीबीचे गोलंदाजी प्रशिक्षक होते, तर गॅरी कर्स्टन मुख्य प्रशिक्षक होते. २०१९ च्या हंगामात आरसीबी गुणतालिकेत तळाशी राहिली आणि परिणामी, त्या दोघांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. २०२० च्या हंगामासाठी माईक हेसन आणि सायमन कॅटिच यांनी पदभार स्वीकारला आणि सर्व काही बदलले. पार्थिव यांच्या खुलासानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पार्थिवने खुलासा केला की, ठकर्णधारपदाच्या शर्यतीत मोईन अलीदेखील होता, मी याबद्दल कधीच बोललो नाही, मला सांगण्यात आले होते, ‘तयार रहा, पुढच्या वर्षी तू कर्णधार होणार आहे. पण पुढच्या वर्षी, आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांना प्रशिक्षक म्हणून संघ सोडावा लागला.  नवीन प्रशिक्षक आले आणि मला त्या संपूर्ण हंगामात एकही सामना खेळायला मिळाला नाही.”

पार्थिव पटेलला २०२० मध्ये एकही सामना खेळायला मिळाला नाही. एबी डिव्हिलियर्सने यष्टीरक्षकाची जबाबदारीही स्वीकारली, तर संघात देवदत्त पडिक्कलची एन्ट्री झाली. ही चाल आरसीबीसाठी यशस्वी ठरली आणि संघ २०१६ नंतर प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरला. दरम्यान, पार्थिव पटेलने २०२० च्या हंगामानंतर निवृत्ती जाहीर केली. विराटकडे संघाचे नेतृत्त्व हे २०२१ मध्ये सोडले. यानंतर फाफ डुप्लेसीने नेतृत्त्व केले. यानंतर आता संघाचा कर्णधार हा रजत पाटीदार आहे. रजतकडे संघाची धुरा येताच त्याने दोन्ही वर्षी संघाला चॅम्पियन बनवले.

Follow Us
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद