Rishabh Pant | पंत म्हणजे डावखुरा सेहवाग, रिषभच्या आक्रमक फलंदाजीचा दिग्गज क्रिकेटपटू दिवाना

| Updated on: Mar 08, 2021 | 6:51 PM

रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत शानदार शतकी खेळी साकारली.

Rishabh Pant | पंत म्हणजे डावखुरा सेहवाग, रिषभच्या आक्रमक फलंदाजीचा दिग्गज क्रिकेटपटू दिवाना
रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत शानदार शतकी खेळी साकारली.
Follow us on

मुंबई :रिषभ पंत (Rishabh Pant) शानदार आहे. मी मोठया काळानंतर दबाव न घेता आक्रमकपणे खेळणारा खेळाडू पाहिला. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाची 6 बाद 146 अशी (India vs England 4th Test) नाजूक स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर ज्या प्रमाणे पंत खेळला त्याला तोड नाही. पंतने जी कामगिरी केली तसं दुसरा कोणीच करु शकत नाही. तो जितक्या शानदारपणे वेगवान गोलंदाजांना खेळतो तितकाच चांगल्या रित्या तो फिरकीपटूंचा सामना करतो. मी पंतच्या शतकी खेळीचा आनंद लुटला. पंतची बॅटिंग पाहून असं वाटलं की जसं सेहवागच डाव्या हाताने खेळतोय”, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने (inzamam ul haq) रिषभ पंतचं कौतुक केलं. इंझमाम त्याच्या युट्युब चॅनेवर बोलत होता. (Rishabh Pant is like that left handed Virender Sehwag said inzamam ul haq)

रिषभचे शानदार शतक

रिषभने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात शानदार शतक झळकावलं. पंतच्या कारकिर्दीतील हे तिसरं तर भारतातील पहिलं शतक ठरलं. पंतने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी शतक ठोकत टीम इंडियाचा डाव सावरला. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 350 पेक्षा अधिक धावा करता आल्या.पंतला केलेल्या शतकी कामगिरीसाठी चौथ्या कसोटीत ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत

टीम इंडियाने या चौथ्या सामन्यात इंग्लंडवर डाव आणि 25 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह 3-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली. यासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारली. त्यामुळे टीम इंडियाचा अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध मुकाबला होणार आहे. हा सामना जूनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय

रिषभ या 2021 वर्षात सातत्याने चांगली कामगिरी करतोय. त्याने ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतही अफतालून परफॉरमन्स केला होता. पंत टीम इंडियाकडून कसोटीमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पंतने या वर्षात आतापर्यंत एकूण 515 धावा केल्या आहेत. तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहितनेही 474 धावा केल्या आहेत.

कसोटीनंतर आता टी 20 मालिका

दरम्यान कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका पार पडणार आहे. हे सर्वच्या सर्व सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. यामुळे या मालिकेतही पंतचा जलवा पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Video | कीपिंग करताना स्टंपमागे तु फार बडबडतोस, रोहितच्या प्रश्नावर रिषभ काय म्हणाला?

(Rishabh Pant is like that left handed Virender Sehwag said inzamam ul haq)