ENG vs IND 4th Test : संजीव गोयनका पंतबद्दल जे बोलले, ते मनाला स्पर्श करेल, सचिनचे कौतुकाचे शब्दही प्रेरणादायी

ENG vs IND 4th Test : मँचेस्टर टेस्ट मॅचमध्ये दुखापत होऊनही ऋषभ पंत टीमसाठी मैदानात परतला. संघाची गरज ओळखून ऋषभने महत्त्वाचं योगदान दिलं. तो फक्त मैदानावरच आला नाही, तर त्याने शानदार अर्धशतक झळकावून इतरांसमोर आदर्श ठेवला.

ENG vs  IND 4th Test : संजीव गोयनका पंतबद्दल जे बोलले, ते मनाला स्पर्श करेल, सचिनचे कौतुकाचे शब्दही प्रेरणादायी
rishabh pant
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 25, 2025 | 10:54 AM

ऋषभ पंतने मँचेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्याने टीमसाठी अर्धशतकी खेळी केलीच. पण चाहत्यांच सुद्धा मन जिंकलं. इंग्लंड विरुद्ध मँचेस्टर टेस्टमध्ये पहिल्यादिवशी ऋषभच्या पायाला चेंडू लागला. त्यावेळी तो वेदनेने कळवळलेला. दुखापत असूनही ऋषभ पंत दुसऱ्यादिवशी मैदानात फलंदाजीसाठी उतरला. 54 धावांची तो शानदार इनिंग खेळला. ऋषभ पंतच्या या इनिंगचं लखनऊ सुपर जायंट्स टीमचे मालक संजीव गोयनका आणि गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरने भरपूर कौतुक केलं.

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या सीजनमध्ये ऋषभ पंत लखनऊ सुपर जायंट्स टीमकडून खेळलेला. त्याला लखनऊ टीमने 27 कोटी रुपयांमध्ये विकत घेऊन कॅप्टन बनवलं. ऋषभला आयपीएलच्या या सीजनमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. पण लीगच्या शेवटच्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावलं होतं. लखनऊ सुपर जायंट्स टीमचे मालक संजीव गोयनका यांनी मँचेस्टर टेस्टमधील ऋषभच्या इनिंगबद्दल ट्विट केलं. ‘हे फक्त टॅलेंट नाही, कॅरेक्टर आहे, सॅल्यूट’ असं त्यांनी टि्वटमध्ये लिहिलं.


सचिन तेंडुलकर ऋषभच कौतुक करताना काय म्हणाला?

इतकच नाही, सचिन तेंडुलकरने सुद्धा आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन टि्वट केलं. “ऋषभने कमालीच कॅरेक्टर दाखवलं. दुखापत होऊनही तो मैदानात परतला. दमदार प्रदर्शन केलं. आपल्या देशाकडून खेळण्यासाठी किती धैर्य आणि मजबूत संकल्प पाहिजे ते ऋषभच्या अर्धशतकातून दिसून येतं. ऋषभची ही इनिंग दीर्घकाळ लक्षात ठेवली जाईल. त्याने खूप सुंदर फलंदाजी केली” अशा शब्दात सचिन तेंडुलकरने ऋषभ पंतच कौतुक केलं.


भारताच्या 358 धावा

ऋषभने आपल्या 54 धावांच्या खेळती तीन फोर आणि दोन सिक्स मारले. त्याच्या याच इनिंगच्या बळावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 358 धावा केल्या. टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वलाने 58 धावांच योगदान दिलं. साई सुदर्शनने 61 धावा केल्या. केएल राहुलने 46 आणि शार्दुल ठाकूरने 41 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडकडून कॅप्टन बेन स्टोक्सने पाच विकेट काढल्या. जोफ्रा आर्चरने तीन विकेट काढल्या.