Rohit Sharma : रोहित शर्मा सुधारणार नाही…आता काय विसरला ? Video बघाच

IND vs SA : रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडेमध्ये रोहित शर्मनाने तूफान बॅटिंग करत शानदार अर्धशतक झळकावलं. तर विराटने खणखणीत शकत झळकावत 135 धावा केल्या. या म2चमध्ये भारातने 17 धावांनी विजय मिळवला. पुढच्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज असला तरी रांची एअरपोर्टवर रोहित शर्माचा विसरभोळेपणा पुन्हा दिसून आला.

Rohit Sharma : रोहित शर्मा सुधारणार नाही...आता काय विसरला ?  Video बघाच
पुन्हा काहीतरी विसरला रोहित शर्मा..
Image Credit source: social media
| Updated on: Dec 02, 2025 | 8:24 AM

Rohit Sharma Video : भारतीय क्रिकेट संघातील नामवंत खेळाडूंपैकी एक असलेला रोहित शर्मा हा एक उत्तम फलंदाज आहे यात शंकाच नाही. त्याची बॅटिंग स्टाईल, त्याचे रेकॉर्ड्स, खेळी निर्विवाद आहे. पण त्याच्या एका सवयीमुळे फकेत त्याची पत्नी नव्हे तर संपूर्ण टीम, मित्र-मंडळीही हैराण होतात. या सवयीमुळे रोहित शर्माची वेळोवेळी मजा घेतली गेली, त्याची टरही उडवली गेली. रांचीमध्ये टीम इंडियाने पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला हरवत टीम इंडियाने विजयी सुरूवात केली, त्यात रोहित शर्माचे अर्धशतक आणि विराट कोहलीचे खणखणीत शतक (135 धावांची खेळी) याचा मोलाचा वाटा होता. मात्र त्याच रांचीमध्ये असं काही घडलं की रोहित शर्माच्या एका सवयीमुळे तो पुन्हा मजेचे टार्गेट ठरत आहे. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर त्याच्या सवयीचा, एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

असं काय केलं रोहित शर्माने ?

रोहित शर्माने रांची मध्ये नेमकं असं काय केलं ? असा प्रश्न पडला असेल ना.. चला जाणून घेऊया. खरंतर रोहित शर्मा जेव्हा रांची येथील हॉटेलमधून एअरपोर्टवर पोहोचला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याचा विसरभोळेपणा दिसला, कारण तो बसमध्येच त्याची एअरपॉड केस विसरला होता. रोहित शर्मा हा एअरपोर्टचा वेटिंग एरियामध्ये बसला होता आणि त्याच्या हे लक्षातच नव्हतं की तो त्याची एअरपॉड केस बसमध्ये विसरून गेला आहे. त्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एक व्यक्ती त्याच्याजवळ गेला आणि त्याने रोहितला ती केस दिली. ते पाहून रोहितला आठवलं की आपण काय विसरलो होतो ते. तेव्हा त्याने सपोर्ट स्टाफचे आभारही मानले. हा व्हिडीो सध्या खूप व्हायरल होत असून लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटतंय.

 

विसरभोळा रोहित शर्मा

उत्कृष्ट क्रिकेटर, फलंदाज आणि उत्तम माणूस असा रोहित शर्मा हा थोडा विसरभोळा आहे, त्याला जणू विसरण्याची सवयच लागली आहे. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये रोहितच्या या सवयीबद्दल सांगितलं आहे. रोहित शर्मा हा त्याचा पासपोर्ट, कधीकधी सूटकेस देखील हॉटेलमध्ये विसरून जातो. यावेळी तर तो बसमध्ये एअरपॉड केसच विसरला. पण असं असलं तरी खणखणीत फलंदाजी करायला तो कधीच विसरत नाही. रांचीत नुकत्याच झालेल्या वनडेमध्ये रोहितने 51 चेंडूत 57 धावा फटकावल्या. त्यामध्ये 5 चौकार आणि 3 षटकरांचा समावेश होता. त्यासह त्याने सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड केला आहे. या मॅचमध्ये रोहितने विराटसह चांगली खेळी केली विराटने 135 धावा केल्या, त्याचं 52 वं शतक पूर्ण झालं. त्यांच्या खेळीमुळे भारताने 50ल षटकांत 349 धावा केल्या आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला रोखत 17 धावांनी निजय मिळवला.