Rohit Sharma Video: रोहितने खिशात हात घातला अन् खिशातून…लालबागच्या चरणापाशीचा Video Viral

Rohit Sharma Video: रोहित शर्माचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे ज्यात रोहित शर्मा लालबागचे दर्शन घेत असताना त्याने खिशात हात घातला आणि काहीतरी काढले.

Rohit Sharma Video: रोहितने खिशात हात घातला अन् खिशातून...लालबागच्या चरणापाशीचा Video Viral
| Updated on: Sep 21, 2026 | 3:09 PM
टीम इंडियाचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा पत्नीसह मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला. रविवारी उशिरा संध्याकाळी रोहित शर्मा आपल्या कारने लालबागमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याच्या दर्शनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रोहित शर्मा पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचल्याचे समोर आले आहे. रोहितला पाहण्यासाठी परिसरात चाहत्यांची गर्दी होणं हे साहाजिक होते. रोहित, रोहित, रोहित, रोहितच्या घोषणांनी परिसर गाजला होता. यावेळी रोहित व रितिकाने मनोभावे बाप्पाची पूजा करत दर्शन घेतले. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दर्शन घेतल्यानंतर रोहितने आपल्या खिशातून काहीतरी बाहेर काढले.

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका शर्मा बाप्पाच्या मूर्तीजवळ उभे होते. याचवेळी रोहित आपल्या खिशातून काहीतरी बाहेर काढतो आणि ते बाप्पासमोर ठेवतो. त्याने खिशातून एखादी चिठ्ठी काढल्याचे अंदाज बांधला जात आहे.  तर काही लोक त्याने पैसे अर्पण केल्याचेही म्हणत आहे, काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे काही दिसत नाहीये. याचदरम्यान व्हिडीओमध्ये आणखी एक गोष्टीने लक्ष वेधून घेतले आहे. रोहित आणि रितिका हे दोघेही लालबागच्या राजाजवळ उभे होते आणि यावेळी त्या दोघांमध्ये चर्चा झाली होती. यानंतर रितिकाने लालबागच्या राजा मंडळातील एका कार्यकर्त्याला जवळ बोलावून काहीतरी विचारल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. रितिका आणि त्या कार्यकर्त्यामध्ये चर्चा झाली. मात्र, चर्चा काय झाली हे अद्याप समोर आलेले नाही.

रोहित शर्मा लवकरच पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 27 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. आगामी मालिकेत मोठी खेळी करत आपली छाप पाडण्याचा रोहितचा प्रयत्न असणार आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रोहितच्या भविष्यासंदर्भात विविध चर्चा सुरू असताना मुंबईच्या राजाने आता लालबागच्या राजाच्या दर्शन घेतले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us