Rohit Sharma : रोहितला आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी कॅप्टन बनवलय, पण त्याच्या विचाराची पद्धत एकदम उलटी..यालाच म्हणतात कॅप्टन थिंकिंग

Rohit Sharma Mumbai Indians Captain IPL 2027 : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनल्यानंतर रोहित शर्माने एक इंटरव्यू दिला आहे. अनेकांन वाटतय की या वयात रोहितला कॅप्टन बनवण्याचा निर्णय योग्य नाही. पण कॅप्टन थिंकिंग काय असते ते रोहित या मुलाखतीतून उलगडलं.

Rohit Sharma : रोहितला आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी कॅप्टन बनवलय, पण त्याच्या विचाराची पद्धत एकदम उलटी..यालाच म्हणतात कॅप्टन थिंकिंग
Rohit Sharma
Image Credit source: Screengrab from X/@mipaltan
| Updated on: Nov 28, 2026 | 4:56 PM

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2027 सीजनसाठी पुन्हा एकदा रोहित शर्माला कर्णधारपदी नियुक्त केलं आहे. पुढच्या सीजनमध्ये हार्दिक पंड्या पंजाब किंग्सकडून खेळणार आहे. त्यानंतर मुंबईने कर्णधारपदाची माळ पुन्हा एकदा यशस्वी कर्णधाराच्या गळ्यात घातली आहे. रोहितने स्वत: आता या बद्दल काही खुलासे केले आहेत. “मी कर्णधारपद स्वीकारणार नव्हतो. पण टीमचे मालक आकाश अंबानी यांच्याशी चर्चा केल्यानंतर या प्रस्तावावर विचार केला, अखेरीस हे आव्हान स्वीकारलं” मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडिया हँडलवर रोहित शर्माने इंटरव्यू दिलाय. “आकाश अंबानी मला भेटले व टीमच्या भविष्याबद्दल चर्चा केली. याच भेटीत मला मी पुन्हा कॅप्टन बनणार का? म्हणून विचारण्यात आलं”

“प्रामाणिकपणे मी या जबाबदारीसाठी तयार नव्हतो. मी घरी जाऊन यावर विचार केला. मागच्या काही काळात बरचं काही घडलं होतं. मी मानसिक दृष्ट्‍या या जबाबदारीसाठी तयार आहे की नाही हे मला माहित नव्हतं” असा रोहितने खुलासा केला. “मी या विषायवर माझ्या पत्नीशी सुद्धा चर्चा केली. विचारविनिमय केल्यानंतर मला वाटलं की, मुंबई टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी योग्य दिशेची आवश्यकता आहे. मी हे म्हणत नाहीय की, लीडर म्हणून माझी आवश्यकता आहे. पण टीमला दिशेची आवश्यकता आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.

Loading...

रोहितने प्रामाणिकपणे काय मान्य केलं?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. 2023 च्या सीजनपासून फ्रेंचायजीने हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवलं. पण हा निर्णय यशस्वी ठरला नाही. मुंबईला एकाही सीजनमध्ये विजेतेपदाला गवसणी घालता आली नाही. मुंबई 2024 च्या सीजनमध्ये दहाव्या, 2026 मध्ये नवव्या आणि 2025 मध्ये क्वालिफायर -2 पर्यंत पोहोचली.”मागच्या काही सीजनमधील टीमच्या प्रदर्शनावर खेळाडू निराश होते. प्लेऑफमध्ये स्थान न मिळवणं हीच फक्त समस्या नव्हती तर टीम आपल्या क्षमतेनुसार क्रिकेट खेळत नव्हती. निराशा कुठल्या एका खेळाडूपर्यंत मर्यादीत नव्हती” असं रोहित शर्माने सांगितलं.

नव्या सीजनसाठी रोहितचा विचार काय असेल?

कॅप्टन बनल्यानंतर नव्या सीजनसाठी काय विचार असेल ते रोहितने जाहीर केलय. “खेळाडू सुरुवातीपासून विजेतेपदाच्या दबावाखाली राहू नयेत. ड्रेसिंग रुममध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. खेळाडूंना मोकळेपणाने खेळू देण्याचा कल असेल. एक गोष्ट मी कटाक्षाने टाळणार ते म्हणजे ट्रॉफीबद्दल बोलणं टाळणार. ट्रॉफी अजून लांब आहे, सर्व प्रथम आम्ही खेळाचा आनंद घेतला पाहिजे” असं रोहित शर्मा म्हणाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us