Rohit Sharma | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, बीसीसीआयकडून डॅमेज कंट्रोल?

| Updated on: Nov 09, 2020 | 1:28 PM

रोहित शर्माला दुखापतीचे कारण देत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. (Rohit Sharma should be go Australia tour later and join team India)

Rohit Sharma | हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार, बीसीसीआयकडून डॅमेज कंट्रोल?
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australia Tour) भारतीय संघात स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. रोहित शर्माला दुखापतीचे कारण देत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय झाला आहे.  रोहित शर्मा डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. (Rohit Sharma should be go Australia tour later and join team India)

भारतीय क्रिकेट टीमशी संबंधित सूंत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा 11 नोव्हेंबरला भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. मात्र, 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रोहितचा संघात समावेश होऊ शकतो. तोपर्यंत रोहित शर्मा दुखापतीतून बरा होण्याची अपेक्षा आहे.

रोहित शर्मा सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये मंगळवारी लढत होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे.

टीम इंडियासाठी अनफिट आणि आयपीएलसाठी फिट?

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड झाली तेव्हा रोहित शर्मा दुखापतीमुळे अनफिट असल्याचे कारण देत त्याला वगळ्यात आले. रोहित शर्माला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा आयपीएलच्या अखेरच्या लीग मॅचमध्ये हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरला होता. यावरुन बीसीसीआय आणि निवड समितीला टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, बीसीसीआयकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाठवण्याचा विचार करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अ‌ॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अ‌ॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

असा आहे कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

India Tour Australia | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यात विराट खेळणार नाही?

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

(Rohit Sharma should be go Australia tour later and join team India)