India Tour Australia | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यात विराट खेळणार नाही?

कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India Tour Australia | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यात विराट खेळणार नाही?

दुबई : आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2020) समाप्तीनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Australia) जाणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडिया टी 20, एकदिवसीय मालिकेनंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यात कर्णधार विराट कोहली खेळणार नाही, अशी माहिती सूंत्राद्वारे मिळाली आहे. india tour australia will virat not play in the last 2 matches of the test series against australia

नक्की कारण काय?

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई बाबा होणार आहेत. अशा भावनिक परिस्थितीत विराट टीम इंडियासाठी तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळण्यात येणार आहेत. या मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना 7 आणि 15 जानेवारी 2020 ला खेळण्यात येणार आहे. विराटच्या घरी या कालावधी दरम्यान नवीन पाहुणा येणार असल्याने विराट या शेवटच्या 2 कसोटीतून माघार घेण्याची शक्यता आहे. मात्र विराटने याबाबत कोणतेही औपचारिक माहिती दिलेली नाही. अनुष्का-विराटने बेबी बंपसह त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

इटलीत 2017 मध्ये लग्न

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये विवाबबद्ध झाले. विराट आणि अनुष्का एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्या जाहिरातीवेळी विराट थोडा अस्वस्थ होता. अभिनयाबाबत विराटला तितकीशी माहिती नसल्यामुळे विराट ‘दबावात’ होता. मात्र या जाहिरातीनंतर विराट आणि अनुष्का यांचा एकमेकांशी संवाद वाढला. पुढे त्यांची मैत्री आणि प्रेम झालं. मग मीडियात त्यांच्या अफेयरची चर्चा जोर धरु लागली. त्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली.

असा आहे भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

Photo : अनुष्काचा नवा अवतार, बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर

कुणीतरी येणार येणार गं!! अनुष्का-विराटकडे ‘गुड न्यूज’

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

india tour australia will virat not play in the last 2 matches of the test series against australia

Published On - 10:45 pm, Sat, 7 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI