Rohit Sharma: रोहित शर्मा 9 दिवसात दिसतोय स्लिम, जोरदार पुनरागमनाची तयारी सुरू

विश्वचषक स्पर्धेत वरिष्ठ खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

Rohit Sharma: रोहित शर्मा 9 दिवसात दिसतोय स्लिम, जोरदार पुनरागमनाची तयारी सुरू
rohit sharma
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 19, 2022 | 3:04 PM

मुंबई : आशिया चषकापासून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) खराब फॉर्म सुरु आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या कर्णधारपदासह फॉर्मवर शंका उपस्थित केली आहे. मागच्या अनेक मॅचमध्ये (Match) रोहितची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. टीम इंडियामध्ये (Team India) मोठा बदल होणार असल्याचं सुचक वक्तव्य बीसीसीआयने केलं होतं. हार्दीक पांड्याला T20 फॉरमॅटमधील कर्णधारपद देण्यात येणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत वरिष्ठ खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहूल या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धा संपल्यापासून रोहित शर्मा सोशल मीडियापासून लांब आहे.

रोहित शर्माने त्याच्या फिटनेसवरती लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. तो जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडविरुद्ध ज्यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला. त्यावेळी चाहत्यांनी सोशल मीडियावर रोहितच्या फिटनेसविषयी चर्चा केली.

खूप दिवसांनी रोहित शर्माने आपल्या ट्रेनिंगचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला पाहून काही चाहते स्लिम झाल्याचं म्हणतं आहेत. बांगलादेशच्या दौऱ्यात रोहित शर्मा चांगलं पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे.