Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने पुन्हा खेळली तुफानी खेळी, गोलंदाजांची केली धुलाई

ऋतुराज गायकवाडचा मैदानात पुन्हा धुमाकूळ, 18 चौकार आणि 6 षटकारांची आतषबाजी

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडने पुन्हा खेळली तुफानी खेळी, गोलंदाजांची केली धुलाई
ruturaj gaikwad maharashtra
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 30, 2022 | 3:21 PM

मुंबई: विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) उपांत्य फेरीत पुन्हा ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad)गोलंदाजांची चांगली धुलाई केली. सलग सात षटकार मारल्यामुळे चर्चेत आलेल्या गायकवाडची पुन्हा एकदा तुफानी खेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आसामविरुद्धच्या (Assam)सामन्यात ऋतुराज गायकवाडने 125 चेंडूत 168 धावा केल्या. आजच्या खेळीत त्याने 14 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. दोनवेळा तुफानी खेळी केल्यामुळे त्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे. आजच्या मॅचमध्ये त्याने 88 चेंडूत शतक पुर्ण केले. विशेष म्हणजे आजही त्याचं द्विशतक हुकलं आहे.

विजय हजारे ट्रॉफी 2021-22 मध्ये ऋतुराज गायकवाडची धावसंख्या

136(112)
154*(143)
124(129)
21(18)
168(132)
124*(123)
40(42)
220*(159) उपांत्यपूर्व फेरीत
उपांत्य फेरीत 168(126)

मागच्या मॅचमध्ये ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेशच्या विरुद्ध 220 धावांची पारी खेळली होती. शिव सिंह याच्या गोलंदाजाची चांगली धुलाई केली होती. त्याच्या एका ओव्हरमध्ये 43 धावा काढल्या. ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्ज या टीमकडून आयपीएलमध्ये खेळताना चांगली खेळी केली आहे.