
टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर सद्या सोशल मीडियासह मैदानात सुद्धा धुमाकूळ घालतोय, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिनच्या बॅटमधुन कालच्या मॅचमध्ये तुफान फलंदाजी झाली, त्यामुळे तेंडूलकरचे चाहते एकदम खूश आहेत.

अर्जुनला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या दरम्यान मुंबई इंडियन्स संघात तो दिसला होता. आयपीएलमध्ये सुद्धा त्याला अद्याप संधी मिळालेली नाही.

.डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर सध्या युवराज सिंगच्या वडिलांकडून ट्रेनिंग घेत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे.

22 सप्टेंबरपासून चंदीगड येथे आयोजित 27 व्या अखिल भारतीय जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत अर्जुन तेंडूलकर भाग घेत आहे. युवराज सिंगचे वडिल अर्जुनला नेटमध्ये क्रिकेटचे सगळे डावपेच शिकवताना दिसत आहेत.