Sania Mirza: माझा होण्यासाठी खरंच खूप Thank you… सानिया मिर्झाच्या पोस्टने वेधलं लक्ष, कोणासाठी असं म्हणाली?

Sania Mirza News: माजी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची आता जोरदार चर्चा होत आहे.

Sania Mirza: माझा होण्यासाठी खरंच खूप Thank you... सानिया मिर्झाच्या पोस्टने वेधलं लक्ष, कोणासाठी असं म्हणाली?
| Updated on: Oct 31, 2026 | 8:00 AM

Sania Mirza New Post: माजी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची आता जोरदार चर्चा होत आहे. ही पोस्ट सानियाने तिच्या मुलासाठी शेअर केली आहे.  तिचा मुलगा इझान मिर्झा मलिकसाठी एका खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सानियाने सोशल मीडियावर आई आणि मुलाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये इझान तिच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. हा फोटो ८ वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यात इझान खूप लहान दिसतो. हा फोटो इझानच्या जन्मानंतर काही दिवसांनी काढलेला आहे. मात्र, दुसरा फोटो याच वर्षीचा आहे, ज्यामध्ये इझान खूप मोठा दिसतो.

सानियाने फोटोंसोबत एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “सर्वोत्तम बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझे हृदय खूप मोठे आणि निर्मळ आहे. माझा होण्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद.” सानियाने कॅप्शनमध्ये हे देखील स्पष्ट केले आहे की इझान आता ८ वर्षांचा आहे.

Loading...

सानियाच्या पोस्टच्या कॅप्शनचा संबंध तिच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडला जात आहे. लोक असा अंदाज लावत आहेत की ती तिचा माजी पती शोएब मलिकवर अप्रत्यक्षपणे टीका करत आहे.  सानियाने तिच्या पोस्टमध्ये शोएबचा उल्लेख केला नाही किंवा या प्रकरणी कोणतीही थेट टिप्पणी केली नाही.

२०२४ मध्ये घटस्फोट

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी एप्रिल २०१० मध्ये लग्न केले. २०१८ मध्ये त्यांचा मुलगा इझान याचा जन्म झाला. सुमारे १४ वर्षांनंतर, जानेवारी २०२४ मध्ये, सानियाच्या कुटुंबीयांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाल्याची पुष्टी केली. यानंतर, शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले.

सानिया तिच्या मुलाची जबाबदारी एकटीने सांभाळते. शोएब मलिक हा पाकिस्तानात राहत असल्यामुळे मुलगा इजान आणि त्याची भेट ही क्वचितच होते. दरम्यान शोएबचे हे तिसरे लग्न आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या तिसऱ्या लग्नातही काही अडचणी असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us