Cricket world cup 2019 : पाकिस्तानला विजयाच्या शुभेच्छा दिल्यानंतर सानिया मिर्झा ट्रोल

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक करत काल 3 जूनला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. पाकिस्तानला विजयाच्या शुभेच्छा दिल्यानंतर भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे.

Cricket world cup 2019 : पाकिस्तानला विजयाच्या शुभेच्छा दिल्यानंतर सानिया मिर्झा ट्रोल
| Updated on: Jun 04, 2019 | 6:00 PM

Cricket world cup 2019 लंडन : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार सुरु झाला आहे. 10 संघ आणि 48 सामने असं या विश्वचषकाचं स्वरुप असून आतापर्यंत 7 सामने खेळवण्यात आलेत. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक करत काल 3 जूनला इंग्लंड विरुद्ध झालेल्या  दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तान टीमला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मात्र सानियाच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे.

काल 3 जूनला इंग्लंडच्या Trent Bridge या मैदानात पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडचा सामना खेळवण्यात आला. या सामान्यात पाकिस्तानने 8 बाद 348 धावा एवढी मोठी धावसंख्या उभारली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 9 बाद 334 धावा केल्या. अवघ्या 14 धावांनी पाकिस्तानने सामना जिंकला आणि विजयी सलामी दिली. या सामन्यात मोहम्मद हफीजने 84 धावा, बाबर आजमने 63 धावा आणि पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद 55 धावा केल्या. तर इंग्लंडच्या टीमकडून जो रुटने 107 धावा आणि जोस बटलरने 103 धावसंख्या उभारली. मात्र हे दोन खेळाडू तंबूत परतल्यानंतर इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या रचता आली नाही आणि इंग्लंडचा पराभव झाला.

या विजयानंतर क्रिकेटर शोएब मालिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने पाकिस्तानला शुभेच्या दिल्या. “पाकिस्तानच्या क्रिकेट टीमच्या जोरदार कमबॅकसाठी आणि विजयासाठी शुभेच्छा. सामना नेहमीप्रमाणेच अनपेक्षित होता. दिवसेंदिवस क्रिकेटचा विश्वचषक रंगतदार होत चालला आहे”, असे ट्विट सानिया मिर्झाने केलं.

या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिच्या ट्विटखाली भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात तुम्ही कोणाला सपोर्ट करणार असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तर काहींनी सानिया मॅम तुम्ही 16 जूनला कोणला चिअर करणार, पाकिस्तान कि भारत? असे असंख्य प्रश्न विचारुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

येत्या 16 जूनला इंग्लंडच्या मॅनचेस्टर मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार आहे. गेल्या 44 वर्षात वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानाने कधीही भारताचा पराभव केलेला नाही. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना बघण्यासाठी सर्वचजण फार उत्सुक असतात. उद्या भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.