AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय मांजरेकर यांचा विराटला खास सल्ला, म्हणाले, ‘बाहेरच्या गोष्टींवर बोलताना जरा सांभाळून…’

भारताचे माजी खेळाडू समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला खास सल्ला दिला आहे. Sanjay manjarekar suggestion Virat kohli

संजय मांजरेकर यांचा विराटला खास सल्ला, म्हणाले, 'बाहेरच्या गोष्टींवर बोलताना जरा सांभाळून...'
Virat kohli And Sanjay Manjarekar
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 23, 2021 | 1:12 PM
Share

पुणे :  भारताचे माजी खेळाडू समालोचक संजय मांजरेकर (Sanjay manjarekar) यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) खास सल्ला दिला आहे. लोकांच्या टीकेवर किंवा चर्चांवर बाहेरच्या गोष्टींवर थोडंस शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर किंवा याच्यापासून शक्य होईल तेवढं लांब रहा, असा सल्ला मांजरेकर यांनी विराटला दिला आहे. (Sanjay manjarekar suggestion Indian Captain Virat kohli)

काय म्हणाले संजय मांजरेकर?

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत के.एल. राहुल वरच्या टीकेसंबंधी प्रश्न विचारल्यानंतर विराटने बाहेरच्या फालतू गोष्टी, असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर संजय मांजरेकर यांनी ट्विट करुन विराटला खास सल्ला दिला आहे. अशा बाहेरच्या गोष्टींवर बोलताना शांत होऊन बोलण्याचा प्रयत्न कर, असं मांजरेकरांनी सांगितलं आहे.

त्याचवेळी मांजरेकर यांनी प्रेक्षकांचं क्रिकेटविषयीचं तसंच खेळाडूंविषयीचं मत महत्त्वाचं आहे, हे ही मान्य केलंय. तसंच क्रिकेट रसिकांच्या मतांना सन्मान दिला पाहिजे, असंही ते म्हणाले. विराट ज्या गोष्टींना फालतूच्या गोष्टी म्हणाला खरं तर त्या गोष्टी एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीविषयी होत्या. त्यामुळे अशा गोष्टींवर बोलताना थोडीशी काळजी घ्यायला हवी, असं मांजरेकर म्हणाले.

विराटला सल्ला देताना मांजरेकरांना धोनीची आठवण

मांजरेकर यांनी विराटला सल्ला देताना महेंद्र सिंग धोनीची आठवण काढली आहे. मांजरेकर म्हणाले, विराटने वस्तुस्थितीचा संयम आणि परिपक्वतेने स्वीकार करायला हवा, जसा धोनीने केला होता.

‘बाहर की फालतू की बातें’, विराटच्या शब्दप्रयोगावर मांजरेकरांचा सल्ला

भारताने पाहुण्या इंग्लंडला 5 टी ट्वेन्टी (india Vs england T20) सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने हरवलं. परंतु या मालिकेत धडाकेबाज फलंदाज के.एल. राहुलच्या (KL Rahul) बॅटचा जलवा काही दिसला नाही. या मालिकेत त्याचा फ्लॉप परफॉरमन्स पाहायला मिळाला. त्याच्या बॅटिंगवर अनेक दिग्गजांनी तसंच क्रिकेट रसिकांनीही टीका केली. याच टीकाकारांना उत्तर देताना विराट चिडलेला पाहायला मिळाला. ‘बाहर की फालतू की बातें’, असा शब्दप्रयोग त्याने केला. याच शब्दप्रयोगावरुन मांजरेकरांनी विराटला सल्ला दिलाय.

Ind Vs Eng : पुण्यात पहिला एकदिवसीय सामना, हे 4 धुरंधर टीम इंडियाची बाजी पलटवू शकतात!

Rohit Sharma : वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडण्यासाठी हिटमॅन रोहित शर्मा सज्ज

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...