
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुकलरचे सोसल मीडियावर लाखो चाहते आहेत. सध्या सारा जग फिरण्यासाठी बाहेर पडली आहे. आधी ऑस्ट्रेलिया, नंतर लंडन आणि सध्या ती फ्रान्समध्ये मजा करताना दिसत्ये. काही दिवसांपूर्वी तिने फ्रान्समध्ये समुद्राचील सफरीचे फोटो शेअर केले तर आता पोस्टे केलेल्या फोटोमध्ये ती समुद्राच्या लाटांमध्ये नाचताना दिसली. यादरम्यान तिने केसांचा अंबाडा आणि सुंदर कानातले असा लूक कॅरी केला होता. यावेली सारा खूप मस्तीच्या मूडमध्येही होती. सुंदर गाणी ऐकत ती नाचत-गात होती. साराने सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही स्टोरी शेअर केल्या. याआधी काही दिवसांपूर्वी ती लंडनमध्ये विम्बल्डनचा आनंद लुटताना दिसली होती.
सारा तेंडुलकरची समुद्रात मस्ती
15 जुलै रोजी फ्रान्समध्ये फ्रेंच क्रांती सुरू झाली. यासाठी फ्रान्समध्ये उत्सव आयोजित करण्यात आले होते. सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारादेखील या उत्सवात सहभागी झाली होती. या दरम्यान तिने समुद्राच्या लाटांमध्ये बोटिंगचा आनंदही घेतला. तिने याचा फक्त व्हिडिओच बनवला नाही तर तो तिच्या इंस्टा स्टोरीवर पोस्टही केला.
सुट्टीचा आनंद घेणारी सारा या काळात तिच्या मैत्रिणी साशा जयराम आणि अलाविया जाफरीसोबतही दिसली. साशा एक फॅशन डिझायनर आहे, तर अलाविया जाफरी ही अभिनेता जावेद जाफरी यांची मुलगी आहे आणि ती स्वतः एक प्रभावशाली सोशल मीडिया पर्सनॅलिटी देखील आहे.
लंडनचे फोटोही झाले होते व्हायरल
यापूर्वी सारा नुकतीच लंडनमध्ये विम्बल्डनचा आनंद लुटताना दिसली होती. ती तिचे वडील सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्यासोबत सामना पाहण्यासाठी आली होती. साराने त्यांचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तर त्याआधी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे फोटोही लंडनमधून व्हायरल झाले होते. माजी क्रिकेट युवराज सिंगने आयोजित केलेल्या डिनर पार्टीचा हा फोटो होता, ज्यामध्ये सारा तिचे वडील सचिनसोबत आली होती आणि शुभमन गिल टीम इंडियासोबत आला होता.
मात्र त्यापूर्वी सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे सहलीसाठी गेली होती. तिने त्या सहलीचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले होते. तिथे ती माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनच्या मुलीसोबत मजा करताना दिसली.