
प्रत्येक मुलीचे आपल्या वडिलांसोबत एक खास नाते असते. त्यात मैत्रीही असते. मग ते बाप-लेक सामान्य असो किंवा सेलिब्रिटी. अशी एक बाप-लेकीची जोडी नेहमी चर्चेत असते ती म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सारा. सचिन तेंडुलकर आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या मित्रपरिवार, कुटुंबीय ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
वडिलांसोबतचे सुंदर नाते वेगळ्या पद्धतीने व्यक्त केले
सारा तेंडुलकर तिच्या वडिलांवर किती प्रेम करते हे नेहमीच कोणत्या कोणत्या प्रसंगातून समोर येतच. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी त्याचं कौतुक करत साराने त्याच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तिच्या वडिलांबद्दल बोलताना सारा भावनिक झाल्याचं लक्षात येत आहे. सारा तेंडुलकरने वडील सचिनसोबतचे तिचे सुंदर नाते तिच्या शब्दांत व्यक्त केले आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करतं तिने वडिलांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. आणि त्याच शब्दांतून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
वडील सचिनच्या नावाने साराची भावनिक पोस्ट
सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर वडील सचिनसोबतचे नवीन आणि जुने फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ” ज्या व्यक्तीने मला कोणाला न घाबरणे तर शिकवलं पण समोरच्यांचा आदर करायलाही शिकवले. असा व्यक्ती हाताला दुखापत झालेली असताना किंवा इतर अनेक दुखापती झालेल्या असतानाही मला कुशीत उचलून घ्यायचा, माझ्या फोटोशूटचा एक महत्त्वाचा भाग असलेली व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मजा करणे, हसणे आणि जीवनाचा आनंद घेणे किती महत्त्वाचे आहे हे मला शिकवणारी व्यक्ती. माझ्यासाठी तो माझा बाबा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा” असं म्हणत साराने सचिनसोबतच्या तिच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
साराने तिच्या वडिलांना मदत करायला सुरुवात केली आहे.
सारा तेंडुलकर आता सचिनला त्याच्या कामात मदतही करते. ती हे काम खूप चांगल्या प्रकारे करत असल्याचे दिसते. सारा तेंडुलकरने अलीकडेच तिच्या वडिलांच्या एनजीओ सचिन तेंडुलकर फाउंडेशनमध्ये संचालकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
सारापूर्वी अर्जुननेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
सारा तेंडुलकरसोबतच अर्जुन तेंडुलकरनेही वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानेही वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.