PAK vs NAM : शाहिद आफ्रिदीच्या जावयाने चुकवली भारताकडून झालेल्या पराभवाची किंमत, PCB कडून पहिला दणका

PAK vs NAM : भारत आणि पाकिस्तानच्या टीम रविवारी आमने-सामने आल्या होत्या. यावेळी भारताने पाकिस्तानचा तब्बल 61 धावांनी दारुण पराभव केला. टीमच्या या खराब प्रदर्शनानंतर शाहिद आफ्रिदीच्या जावयाला पहिला फटका बसला आहे.

PAK vs NAM : शाहिद आफ्रिदीच्या जावयाने चुकवली भारताकडून झालेल्या पराभवाची किंमत, PCB कडून पहिला दणका
shaheen afridi
| Updated on: Feb 18, 2026 | 4:22 PM

Pakistan vs Namibia : पाकिस्तानी टीमने नामीबिया विरुद्धच्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. त्यांनी शाहीन आफ्रिदी आणि अबरार अहमद यांना बाहेर केलय. अबरार वर्ल्ड टी 20 क्रिकेट रँकिंगमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. मात्र, तरीही त्याला पाकिस्तान टीममधून वगळण्यात आलय. या दोघांनी भारताविरुद्धच्या सामन्यात खूप खराब प्रदर्शन केलं होतं. पाकिस्तानी टीममध्ये सलमान मिर्जा आणि ख्वाजा नफे यांना संधी देण्यात आली आहे. पाकिस्तानने आपली बॅटिंग लाइनअप अजून वाढवलीय. शाहीन आणि अबरारला टीम बाहेर का बसवलं? त्यामागचं कारण सलमान आगाने सांगितलं नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, शाहीन आणि अबरारच्या प्रदर्शनावर पाकिस्तानी सिलेक्टर्सच नाराज आहेत. विशेष म्हणजे बाबर आजम अजूनही टीममध्ये आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये शाहीन आफ्रिदीने 3 सामन्यात 3 विकेट काढले आहेत. त्याचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर 11.22 आहे. हा खूप खराब आहे. टीम इंडिया विरुद्ध शाहीन आफ्रिदीने 2 ओव्हरमध्ये 31 धावा दिल्या होत्या. बाबर आझम भारताविरुद्ध फक्त 5 रन्स करुन आऊट झालेला. त्याने 20 टी वर्ल्ड कपमध्ये 22 च्या सरासरीने 66 धावा केल्या आहेत. बाबरला पाकिस्तानने अजून एक संधी दिलीय.

तर टीममधून तो त्याचं स्थान गमावू शकतो

टीम इंडियाकडून वाईट पद्धतीने पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने शाहीनला टीम बाहेर करण्याची मागणी केली होती. शाहीन नात्यात शाहिद आफ्रिदीचा जावई लागतो. मात्र, तरीही शाहिद आफ्रिदीने ही मागणी केलेली. मोहम्मद युसूफने सुद्धा शाहीन, बाबर आणि शादाब सारख्या खेळाडूंना टीम बाहेर करण्याची मागणी केली होती. बाबर इथेही फेल झाल, तर टीममधून तो त्याचं स्थान गमावू शकतो.

पाकिस्तानची प्लेइंग इलेवन: साहिबजादा फरहान, सॅम अय्यूब, सलमान आगा, बाबर आजम, उस्मान खान, ख्वाजा नफे, शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, सलमान मिर्जा आणि उस्मान तारिक