Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीचा धक्कादायक खुलासा, खेळपट्टीशी छेडछाड केल्याची कबुली

त्यानंतर आफ्रीदी मैदानात खड्डा केला होता, त्यानंतर चेंडू वळायचा सुरुवात झाली. त्यावेळी ती माझी चुकी होती,असं अफ्रिदीने जाहीरपणे सांगितलं आहे.

Shahid Afridi : शाहिद आफ्रिदीचा धक्कादायक खुलासा, खेळपट्टीशी छेडछाड केल्याची कबुली
shahid afridi
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 23, 2022 | 12:09 PM

पाकिस्तानचे खेळाडू (Pakistan Player) अनेक वेगळ्यावेगळ्या कारणामुळे प्रसिद्ध आहेत. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) सुद्धा त्याच्या एका वेगळ्या गोष्टीसाठी फेसम होता. तो त्यांच्या फिरकी गोलंदाजी, आणि आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध होता. त्याने आज एक नवा खुलासा (New Revelation) केला आहे. समा टीव्हीशी बोलताना आफ्रिदीने खेळपट्टीशी छेडछाड केल्याची कबुली दिली आहे.

खेळपट्टीशी छेडछाड करण हे अत्यंत चुकीचं देखील असल्याचं त्याने पुढं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर नेटकरी जोरदार टीका करीत आहेत.

फैसलाबादमध्ये कसोटी सामना ज्यावेळी सुरु होता. त्यावेळी पाकिस्तान टीमची गोलंदाजी अजिबात चालत नव्हती. त्यावेळी तिथं अचानक एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सगळ्यांचं लक्ष त्यावेळी झालेल्या घटनेकडं होतं. विकेट पडत नसल्यामुळे तिथं एखादा खड्डा करायची आफ्रिदीची इच्छा झाली होती.

शोएब मलिकला आफ्रिदीने सांगितले की, आत्ता मैदानात एक खड्डा करण्याची इच्छा झाली आहे. तसंही आत्ता कोणी आपल्याकडे पाहत नाही. त्यावेळी शोएब मलिकने सुद्धा बनवं असं उत्तर दिलं.

त्यानंतर आफ्रीदी मैदानात खड्डा केला होता, त्यानंतर चेंडू वळायचा सुरुवात झाली. त्यावेळी ती माझी चुकी होती,असं अफ्रिदीने जाहीरपणे सांगितलं आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना 2005 मध्ये सुरु होता. त्यावेळी खेळपट्टीशी छेडछाड केल्याची कबुली दिली आहे.