न्यूझीलंडमध्ये मशिदीत गोळीबार, नमाजला गेलेले बांगलादेशी क्रिकेटर बचावले

न्यूझीलंडमध्ये मशिदीत गोळीबार, नमाजला गेलेले बांगलादेशी क्रिकेटर बचावले

वेलिंग्टन: न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंधाधुंद गोळीबारात बांगलादेशचे क्रिकेटपटू थोड्याकात बचावले. न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च इथल्या हेगले ओव्हल मैदानाजवळ शुक्रवारी अल नूर मशिदीत अज्ञाताने गोळीबार केला. या गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी न्यूझीलंड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

बांगलादेश क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या संघातील काही सदस्य नमाज पढण्यासाठी मशिदीत गेले होते. त्यावेळी अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार केला. मात्र सुदैवाने सर्व खेळाडू तिथून सुरक्षित बाहेर पडले. सर्व खेळाडूंना तातडीने हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं. संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बालने ट्विट करुन सर्व खेळाडू सुरक्षित असल्याची माहिती दिली.

दरम्यान, या गोळीबाराननंतर बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील हँगले ओव्हल मैदानावर उद्या होणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे.

मशिदीत झालेल्या गोळीबारावेळी 300 पेक्षा जास्त लोक घटनास्थळी उपस्थित होते. हल्लेखोर हा 20 ते 30 वयोगटातील आहे. त्याने आर्मी रंगाचे कपडे घातले होते. त्याने जवळपास 50 राऊंड फायर केले.

या हल्ल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा अर्डर्न यांनी हा देशातील एक काळा दिवस असल्याचं म्हटलं.

17 मिनिटे लाईव्ह

न्यूझीलंड मीडियाच्या मते, हल्लेखोराने ख्राईस्टचर्च मशिदीतील फायरिंगचा 17 मिनिटे लाईव्ह व्हिडीओ बनवला होता. बंदूकधाऱ्याने आपली ओळख ब्रेंटन टॅरेंट अशी सांगितली. 28 वर्षीय ब्रेंटन टॅरेंट ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे. या हल्लेखोराने अल नूर मशिदीजवळ कार पार्क केली. त्यानंतर त्याने बंदूक काढून मशिदीत घुसला आणि अंदाधुंद फायरिंग केली. त्याच्या गाडीत आणखी हत्यारे असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published On - 10:49 am, Fri, 15 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI