AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: कॅप्टन म्हणून स्वत: फेल पण इतरांना सुनावलं, इंग्लंडविरुद्ध सामना गमावताच श्रेयस अय्यर संतापला; रागाच्या भरात नको ते बोलला

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु असून आता ही मालिका भारतीय संघाने आधीच गमावली आहे. तीन सामने पार पडले असून दोन इंग्लंडने जिंकले तर एक पावसामुळे अनिर्णित राहिला. आता या तिसरा सामनाही भारतीय संघाने गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला ते पाहा...

IND vs ENG: कॅप्टन म्हणून स्वत: फेल पण इतरांना सुनावलं, इंग्लंडविरुद्ध सामना गमावताच श्रेयस अय्यर संतापला; रागाच्या भरात नको ते बोलला
shreyas iyer on team india
| Updated on: Jul 08, 2026 | 8:37 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 125 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. धावांच्या बाबतीत, भारतीय टी20 इतिहासातील हा सर्वात मोठा आणि अविस्मरणीय पराभव आहे. आयर्लंड दौऱ्यावर सुरू झालेली पराभवाची मालिका आता इंग्लंडमध्येही कायम राहिली आहे, ज्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरचे नेतृत्व आणि प्रशिक्षक वर्गावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मानहानीकारक पराभवानंतर, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “ही एक अत्यंत निराशाजनक कामगिरी होती. एवढ्या मोठ्या फरकाने सामना गमावणे अजिबात स्वीकारार्ह नाही. सर्वप्रथम, आम्ही हा मानहानीकारक पराभव स्वीकारतो आणि आम्ही आमच्या रणनीतीची पुर्नविचार करतो. वाटत नाही की खेळपट्टी 200 धावांसाठी योग्य होती, पण आमच्या चुकांमुळे आम्हाला सामना गमवावा लागला.” पराभवापूर्वी आणि नंतर तो तिलक वर्माशी बराच वेळ बोलतानाही दिसला.

कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाचे मुख्य कारण टीम इंडियाच्या खराब फलंदाजीला दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने पॉवरप्लेमध्ये चार महत्त्वाच्या विकेट गमावल्या, ज्यामुळे संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला. संघाची कमजोरी अधोरेखित करताना अय्यर म्हणाला की, “खेळाडू त्यांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरले. आम्ही पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावल्या आणि त्यामुळेच आम्ही सामन्यात खूप मागे पडलो. तुम्ही सामन्यापूर्वी कितीही नियोजन केले तरी, जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता, तेव्हा तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. खेळपट्टीवर योग्य लेंथ कोणती आहे हे समजून घेणे महत्त्वाचे होते. मला वाटले की या विकेटवर हार्ड लेंथ खेळणे कठीण होते, पण आमचे गोलंदाज आणि फलंदाज त्याचा योग्य फायदा घेऊ शकले नाहीत.”

या दारुण पराभवानंतर, टीम इंडिया आता पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने मागे पडली आहे आणि मालिका वाचवण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकावे लागतील. श्रेयस अय्यरने खेळाडूंना आपली जबाबदारी ओळखून आगामी सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करण्याबद्दल बोलण्याचा सल्ला दिला. कर्णधाराने आपले म्हणणे संपवताना म्हटले, “आता भूतकाळात जास्त गुंतून राहण्याऐवजी आपल्याला अधिक मजबूत होऊन परत येण्याची गरज आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने एकत्र बसून वैयक्तिकरित्या विचार केला पाहिजे आणि आगामी सामन्यांमध्ये संघाच्या विजयासाठी आपण सर्वोत्तम योगदान कसे देऊ शकतो हे पाहिले पाहिजे.”

या दारुण पराभवानंतर, टीम इंडिया आता पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने मागे पडली आहे आणि मालिका वाचवण्याासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकावे लागतील. श्रेयस अय्यरने खेळाडूंना आपली जबाबदारी ओळखून आगामी सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करण्याबद्दल बोलण्याचा सल्ला दिला. कर्णधाराने आपले म्हणणे संपवताना म्हटले,”आता भूतकाळात जास्त गुंतून राहण्याऐवजी आपल्याला अधिक मजबूत होऊन परत येण्याची गरज आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने एकत्र बसून वैयक्तिकरित्या विचार केला पाहिजे आणि आगामी सामन्यांमध्ये संघाच्या विजयासाठी आपण सर्वोत्तम योगदान कसे देऊ शकतो हे पाहिले पाहिजे.”

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!.

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!

CJP Protest Delhi : दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये गाड्या फोडल्या; हिंसक वळण.

CJP Protest Delhi : दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये गाड्या फोडल्या; हिंसक वळण

देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला, स्थानकात झाली दगड फेक, प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले….

देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवरच हल्ला, स्थानकात झाली दगड फेक, प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले…

तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल.

तीन वेळच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं, जंतरमंतरच्या आंदोलनाचा व्हिडीओ व्हायरल

हातात होर्डिंग, रिक्षातून प्रवास, मुख्यमंत्री झाले व्हायरल; व्हिडिओची जोरदार चर्चा.

हातात होर्डिंग, रिक्षातून प्रवास, मुख्यमंत्री झाले व्हायरल; व्हिडिओची जोरदार चर्चा

CJP Protest : हे सरकार तर तरुणांच्या विरोधात, पेपर लीक करणारे मोकाट; CJP च्या आंदोलनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया!.

CJP Protest : हे सरकार तर तरुणांच्या विरोधात, पेपर लीक करणारे मोकाट; CJP च्या आंदोलनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया!