Shubman Gill: गिलला दुखापत, बीसीसीआयकडून नव्या कॅप्टनचे नाव समोर, सांभाळणार संघाची धुरा

भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे आता त्याला खेळता येणार नाही. बीसीसीआयने थेट संघाचा कर्णधार बदलला आहे. आता बीसीसीआयने नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आता मैदानावर उतरला आहे.

Shubman Gill: गिलला दुखापत, बीसीसीआयकडून नव्या कॅप्टनचे नाव समोर, सांभाळणार संघाची धुरा
| Updated on: Aug 07, 2026 | 11:40 AM

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने रंगणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला असून जोरदार सराव करतानाही दिसला. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता या मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली ज्यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे आता त्याला खेळता येणार नाही. बीसीसीआयने थेट संघाचा कर्णधार बदलला आहे. आता बीसीसीआयने नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आता मैदानावर उतरला आहे.

श्रीलंकेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल जखमी असून, आजपासून सुरू होणाऱ्या एकमेव सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी तो खेळणार नाही. या तीन दिवसीय सराव सामन्यात तो खेळणार की नाही, हे त्याच्या तंदुरुस्तीच्या अहवालावर अवलंबून असेल. गिलच्या जागी केएल राहुल कर्णधारपद भूषवत आहे. गुरुवारी संघाच्या सराव सत्रादरम्यान गिल एकदा नव्हे, तर दोनदा जखमी झाला होता. श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने नाणेफेक जिंकून तीन दिवसीय सराव सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंका इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळत आहे. हा सामना आज, 7 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.

श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. नियमित कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे संघाचे नेतृत्व करणार नाही. त्याच्या जागी केएल राहुलने कर्णधारपद स्वीकारले आहे. तो या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरणार नाही. शुभमन गिलच्या दुखापतीबद्दल माहिती देताना, बीसीसीआयने सांगितले की, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल गुरुवारी सरावादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, तो एसएलसी इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरणार नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सध्या त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल. गिल या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात उतरेल की नाही हे पाहणे बाकी आहे.”

दुखापतींमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाची चिंता दुखापतींमुळे वाढली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही, त्यामुळे आता वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराजवर असेल. साई सुदर्शनदेखील दुखापतीतून सावरत असून बंगळूरुमध्ये रिहॅब घेत आहे. हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील दुखापतींमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाले आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी 15 ऑगस्ट रोजी गॉलमध्ये सुरू होईल. कसोटीपूर्वी होणाऱ्या या सराव सामन्यामुळे भारतीय खेळाडूंना हवामान आणि खेळपट्टीची परिस्थिती समजून घेण्याची चांगली संधी मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us