
संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. संगीत आणि मेंहदीचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. मात्र, अचानक स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्यते खराब झाली आणि लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. लग्नाला आलेली पाहुणे तशीच परत गेली. लग्नाची केलेली सर्व तयारी काढण्यात आली. मात्र, त्यानंतर पलाशचे काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल होताना दिसली. त्यानंतर पलाश हा स्मृती मानधनाला धोका देत असल्याचा दावा करण्यात आला. पलाशचा खरा चेहरा स्मृती मानधना हिच्यासमोर आल्यानेच तिने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. फक्त स्मृती मानधना हिचे वडीलच नाही तर पलाशलाही रूग्णालयात दाखल करण्यात आले.
पलाश आणि स्मृती मानधना लग्न नेमके कधी करणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार होते. हळदी, मेहंदी आणि संगीत विधी आधीच पूर्ण झाले होते. पलाशवर झालेल्या आरोपानंतर आता एक पोस्ट व्हायरल होत आहे. स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल ही पोस्ट आहे.
स्मृती आणि पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर एका आठवड्याने इव्हेंट कंपनी क्रेयॉन्स एंटरटेनमेंटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पलाश आणि स्मृती मानधना यांच्या लग्नाबद्दलचे मोठे संकेत दिले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी पलाश आणि स्मृती मानधना यांचे नाव घेतले नसले तरीही ही कंपनी स्मृती मानधना आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल बोलत असल्याचा अंदाज लोकांनी लावला आहे.
इव्हेंट कंपनीने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, आयुष्याच्या प्रत्येक सामन्यात आपण अंतिम रेषा ओलांडत नाही, मात्र नेहमीच खेळाडू भावना महत्त्वाची असते. आमच्या संघाने आनंदाने आणि अभिमानाने कठोर परिश्रम केले आणि ते सर्व निश्चितच उल्लेखास पात्र आहे. लवकरच भेटूया, चॅम्पियन…. स्मृती आणि पलाश यांच्याच लग्नाबद्दल ही पोस्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे.