
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगतील प्रियकर पलाश मुच्छल याच्यासोबत स्मृती मानधना लग्नबंधनात अडकणार होती. संगीत, हळद आणि मेहंदीचे खास कार्यक्रम झाली. संगीतच्या कार्यक्रमात स्मृती मानधना सारी दुनिया से जीत के मैं आयी हूं इधर गाण्यावर पलाशसाठी डान्स करताना दिसली. स्मृती मानधना आणि पलाश यांचे संगीत, हळद आणि मेहंदीचे कार्यक्रम जय्यत झाली. संपूर्ण देशाचे लक्ष स्मृती मानधना हिच्या लग्नाकडे लागले होते.
अचानक वडिलांच्या तब्येतीचे कारण देत स्मृती मानधना आणि पलाशचे लग्न पुढे ढकलण्यात आले. यादरम्यानच पलाश याचे धक्कादायक स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरून अंदाज लावण्यात आला की, पलाश याचा खरा चेहरा स्मृती मानधना हिच्यापुढे आल्यानेच तिने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता स्मृती मानधना हिने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहित स्पष्ट शब्दात सांगितले की, लग्न रद्द करत आहे.
यामुळे स्मृती मानधना हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे स्पष्ट दिसत आहे. हेच नाही तर या पोस्टसोबतच तिने सोशल मीडियावरून पलाश मुच्छल याला अनफॉलो केले. स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी होणार होते. 22 नोव्हेंबरपर्यंत सर्व काही ठीक होते, पण अचानक बातमी आली की स्मृतीचे वडील अचानक आजारी पडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
सोशल मीडियावर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न मोडण्याची अनेक कारणने सांगितले जात आहेत. त्यामध्येच अनेक वृत्तांत असा दावा केला जात होता की, पलाशचे अफेअर हे लग्न मोडण्याचे कारण आहे. त्यामध्येच स्मृती हिने स्पष्ट केले की, पलाशसोबत लग्न करणार नाहीये. मात्र, पोस्टमध्ये स्मृती मानधना हिने कुठेच लग्न न करण्याचे कारण सांगितले नाही. हेच नाही तर यावर चर्चा न करण्याचे आवाहन तिने लोकांना केले आहे.