
सध्या बहुतांश लोकांच्य़ा तोंडी संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) आणि स्मृती मानधना (Smriti Mandhna) यांचं नाव आहे, सध्या ते दोघेही सतत चर्चेत आहे. गेल्या रविवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला सांगलीत त्यांचं लग्न होणार होतं. हळद, मेहंदी, संगीत असे अनेक समारंभही झाले. मात्र अचानक ते लग्न पुढे ढकलण्यात आलं.स्मृतीचे वडील श्रीनिवास आजारी असल्याने हाँ निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं तर पण त्यानंतर पलाशने स्मृतीला चीट केल्याच्या अफवा उडू लागल्या. याच दरम्यान, मेरी डि’कोस्टा नावाच्या एका महिलेने पलाश मुच्छलसोबतच्या तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले ज्यामुळे इंटरनेटवर आणखीनच खळबळ उडाली. आता, पलाशचे नाव एका नवीन महिलेशी जोडले जात आहे.
स्मृती आणि पलाश यांच्या संगीत समारंभाचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध बॉलीवूड नृत्यदिग्दर्शक जोडी बॉस्को-सीझर यांच्या टीमने केले होते. सोशल मीडियावर अनेक युजर्स हे या कोरिओग्राफरच्या टीममधील मेंबर गुलनाज खानकडे बोट दाखवत आहेत. पलाश आणि गुलनाज यांचे फोटो ऑनलाइन फिरत आहेत. अलीकडेच, एका रेडिट युजरने यासंबंधात पोस्ट केली होती की, “आम्हाला ती ( जिचं नाव पलाशसोत जोडलं जात होच) कोरिओग्राफर सापडली. पलाशने गुलनाझ खानमुळे स्मृतीची फसवणूक केली” असं त्यायुजरने म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर त्या युजरने स्तुती नावाच्या आणखी एका युजनची पोस्टही शेअर केली. त्यामध्ये स्तुतनी असं म्हटलं होतं की, “बॉस्कोच्या टीममध्ये एक महिला कोरिओग्राफर आहे, गुलनाझ खान. संगीत समारंभादरम्यान ती अनेक व्हिडीओ, शॉर्ट्स आणि रील्समध्ये दिसी होती. पण अजब गोष्ट अशी की आता पलाशने तिला अनफॉलो केलं आहे” असं म्हणत तिने संशय व्यक्त केला. ही पोस्ट व्हायरल होताच लोकांनी गुलनाज खानबद्दल अनेक पोस्ट करत कमेंट सेक्शन भरून टाकलं.
कोण आहे गुलनाज खान?
गुलनाज खान ही मुंबईतील कोरिओग्राफर आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती गेल्या 11 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. ती एक प्रोफेशनल आणि व्हर्सेटाईल डान्सर आहे. 2006 साली ती बॉस्को-सीझर टीममध्ये सामील झाली आणि आजही त्यांच्यासोबत काम करत आहे. आपण असिस्टंट कोरिओग्राफर, अभिनेत्री आणि G-Star इव्हेंट प्लानर असल्याचंही तिने नमूद केलं. तिला इव्हेट प्लानिंगचा 4 वर्षांचा अनुभव असल्याचं तिने लिहीलं आहे.
गुलनाजने अलीकडेच ‘वॉर 2’ मधील ‘आवान जवान’ या गाण्यावर हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत काम केले आहे. ती इंडस्ट्रीमध्ये ‘बँग बँग’, ‘वॉर’, ‘वॉर २’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारख्या कोरिओग्राफी प्रोजेक्टसाठीही ओळखली जाते. एवढंच नव्हे तर तिने राम चरण, शाहिद कपूर, राशा थडानी, हनी सिंग, सिद्धांत चतुर्वेदी, जॅकलिन फर्नांडिस आणि कतरिना कैफ यासारख्या अनेक अ-लिस्ट स्टार्ससोबत काम केले आहे. गुलनाझने स्मृती आणि पलाशच्या हळदी समारंभाचे फोटो देखील शेअर केले होते आणि त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
महिलेकडून स्क्रीनशॉट शेअर
लग्नाला अवघे काही तास असतानाच पलाश-स्मृतीचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. संगीतकार पलाश मुच्छलने स्मृती मानधनाला फसवल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर, मेरी डि’कोस्टा नावाच्या एका महिलेने संगीतकारासोबतच्या तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट पोस्ट केले. यामध्ये पलाश मेरीशी फ्लर्ट करताना आणि तिला भेटण्यास सांगत असल्याचे दिसून आले. काल म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी मेरीने पलाशसोबतच्या तिच्या चॅटबद्दल एक लांबलचक स्पष्टीकरण दिले. एवढंच नव्हे तर, पलाशसोबत ज्या महिला कोरिओग्राफरचं नावं जोडलंजातंय, ती म्हणजे मी नाही असंही तिने स्पष्ट केलंय. कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका असं आवाहनही तिने मीडियाला केलं आहे.