AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana : लग्न टळल्यानंतर स्मृतीने उचललं मोठं पाऊल, इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो; व्हायरल फोटोमागचं सत्य काय ?

क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर काही दिवसांनी पलाशने त्याच डीवाय पाटील स्टेडिअमवर स्मृतीला प्रपोजही केलं होतं. 23 नोव्हेंबरला ते दोघं लग्नबंधनात अरडकणार होते मात्र आता हे लग्न पोस्टपोन करण्यात आलं आहे आहे.

Smriti Mandhana : लग्न टळल्यानंतर स्मृतीने उचललं मोठं पाऊल, इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो; व्हायरल फोटोमागचं सत्य काय ?
स्मृतीने पलाशला केलं अनफॉलो ?Image Credit source: social media
| Updated on: Nov 26, 2025 | 11:33 AM
Share

भारतीय महिला संघाची कर्णधार, स्टार क्रिकेटर स्मृती मानधनासाठी (Smriti Mandhana)  हा महिना खूपच खास होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकत ट्रॉफीवर नावं कोरलं, तर 23 नोव्हेंबरला तिच्या आयुष्यातील आणखी एक आनंदाचा क्षण होता. गेल्या 6 वर्षांपासून ती ज्याला डेट करत होती, त्या स्वप्नातील राजकुमारासोबत तिचा विवाह ठरला होता. 23 नोव्हेंबर रोजी स्मृती मानधना आणि संगीतरकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) लग्नबंधनात अडकणार होते. मात्र त्याच दिवशी अघटित घडलं. ल्गान काही तासांवर आलेलं असतानाच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडली. हार्ट अटॅक आल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वडिलांना बरं वाटल्याशिवाय, ते उपस्थित असल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं म्हणत स्मृतीने तिचा विवाह पुढे ढकलला.

यामुळे एकच खळबळ माजली, कारण 20-21 तारखेपासून सांगलीतील स्मृतीच्या घरी लग्नाचे विधी, हळद, मेहंदी, संगीत थाटात पार पडले होते. भारतीय संघातील तिच्या महिला सहकारी, मैत्रिणी, नातेवाीक सर्वच लग्नासाठी आले होते. पण अखेर स्मृतीने निर्णय घेत हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिचा होणारा पती पलाशचीही तब्येत बिघडल्याचे समोर आले. उपचारांनंतर तो व कुटुंबीय मुंबईला परतले. मात्र त्यानंतर सुरू झाल्या एकेक चर्चा, पलाशने लग्नाच्या दिवसीच स्मृतीला फसवलं, तो दुसऱ्या मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला अशा बऱ्याच अफवा पसरल्या.

स्मृतीने उचललं मोठं पाऊल

या चर्चांना आणखी बळ मिळालं कारण स्मृतीने तिच्या इन्स्टा अकाऊंवरून प्री-वेडिंगचे सर्व फोटो हटवले होते. टीम इंडियातील तिच्या सहकारी मैत्रिणी लग्नासाठी आल्या होत्या. त्यांनीही त्यांच्या अकाऊंटवरून लग्नासंबंधीची फोटो काढून टाकले. यामुळे स्मृती पलाशचं लग्न मोडलं का अशी चर्चा सुरू झाली, रेडिटवर, ट्विटरवरील अनेक फोटो, चॅटसही व्हायरल झाल्यानो गोंधळ आणखी वाढला.

स्मृतीने इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो ?

त्यातच आता आणखी एक फोटो फिरत आहे, त्याने खळबळ वाढली आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्मृतीने पलाश मुच्छल याला अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्याचा एका फोटोही व्हायरल झाला आहे. पण हे खरं आहे का, या व्हायरल फोटो मागचं सत्य आहे तरी काय ? जाणून घेऊया खरी स्टोरी..

खरं काय ?

ही बातमी समोर आल्यावर तिच्या अकाऊंटवर जाऊन चेक केल्याव सत्य समोर आलं. व्हायरल झालेला हा फोटो चुकीचा असल्याचे उघड झाले. कारण स्मृती मंधाना ही अजूनही पलाश मुच्छलला फॉलो करत आहेत. तिच्या फॉलोईंग लिस्टमध्ये अजूही त्याचं नावं दिसत आहे. याचा अर्थ तिने त्याला अनफॉलो केलेलं नाही. त्यामुळे पसरवण्यात आलेलं हे वृत्त अतिशय चुकीचं असल्याचं उघड झालंय. तसंच पलाश मुच्छल हाही अद्याप स्मृतीला फॉलो करत असल्याचं दिसतंय.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.