
Palash Muchhal and Smriti Mandhana Marriage Update : भारतीय महिला क्रिकेट टीममधील खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतयी महिला संघाने वर्ल्डकप जिंकताच सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आली ती म्हणजे स्मृती मानधनाच्या लग्नाची तारीख जाहीर झाली. संगीतकार पलाश मुच्छलसोबत (Palash Muchhal) ती 23 नोव्हेंबरला सांगतील विवाह करणार होती. सर्व विधि, समारंभ झाले, पण कौटुंबिक कारणास्तव स्मृती-पलाशचे लग्न पुढे ढकण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर पलाशची प्रकृतीही बिघडल्याची बातमी आली.
पण याचदरम्यान, पलाशच्या अफेअर्सबद्दल अफवा येऊ लागल्या ज्यामुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले. याप्रकरणात दोन कोरिओग्राफर तरूणींची नावं समोर आली ज्यांचं पलाशशी अफेअर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण आता त्या अफवांना फुलस्टॉप लागला आहे. याप्रकरणात पहिले काल कोरिओग्राफर गुलनाझ खानने तिच्या अकाऊंटवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं होतं. तर आता दुसरी कोरिओग्राफर तरूणी नंदिका द्विदेदी हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ती काय म्हणाली ते जाणून घेऊया.
काय आहे नंदिकाची पोस्ट ?
या सग्ळया प्रकरणात नाव येऊ लागल्यावर नंदिकाने आधी तिचं अकाऊट प्रायव्हेट केल होतं, आता तिने याप्रकरणी एक भलंमोठ्ठं स्टेटमेंट शेअर केलं आहे. ‘ गेल्या काही दिवसांपासून, मी पहात आहे की माझं नाव अशा परिस्थितीशी जोडलं जातंय, ज्यामुळे एखाद्याला खूप वैयक्तिक त्रास झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझ्याबद्दल जे अंदाज लावले जात आहेत आणि मी कोणाच्या तरी नात्याच्या मधे आले, असं जे बोललं जात आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या गोष्टीचा मी भागही नाही त्यात माझं नाव गुंतलेलं पाहणं हे खूप वाईट आहे. या निराधार नॅरेटिव्हने कथेला पूर्णपणे कसं बदलून टाकलं आहे हे समजून घेणे देखील खूप कठीण आहे ‘ असं तिने लिहीलं आहे.
तिच्या स्पष्टीकरणाचा शेवट करताना नंदिका म्हणाली, ‘ याप्रकरणातून बाहेर पडणं मला खूप कठीण जाणार आहे. मी चुकीचे आरोप झेलू शकत नाही. ज्यांना माझी काळजी आहे, त्या लोकांनाही माझ्यामुळे उगाच त्रास सहन करावा लागतोय. आणि तेही अशा माहितीमुळे जी चुकीची आहे. यामुळे माझ्या मानसिक स्थितीवर खूपच परिणाम होतोय’ असंही तिने लिहीलं आहे.
तिचं हे स्टेटमेंट सध्या चर्चेत आलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त केले जात असून स्मृती किंवा पलाश दोघांपैकी कोणीही यावर अजून मौन सोडलेलं नाहीये