AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पलाश मुच्छल याची धक्कादायक पोस्ट, म्हणाला, माझ्याबद्दल जे काही पसरवलं गेलं त्यावरून…

Smriti Mandhana and Palash Muchhal wedding cancelled : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी घेतलेल्या निर्णयानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. स्मृती मानधना हिने लग्न रद्द करत असल्याचे सांगितले. पलाश यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

पलाश मुच्छल याची धक्कादायक पोस्ट, म्हणाला, माझ्याबद्दल जे काही पसरवलं गेलं त्यावरून...
Smriti Mandhana and Palash Muchhal wedding cancelled
| Updated on: Dec 08, 2025 | 1:11 PM
Share

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत आयोजित केले होते. लग्नापूर्वी संगीत, मेहंदी आणि हळद धुमधडाक्यात झाली. या समारंभाचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसली. अखा भारतीय महिला संघ धमाल करताना दिसला. हेच नाही तर स्मृती मानधना हिच्यासाठी खास व्हिडीओही महिला संघाने तयार केला होता. चाहत्यांच्याही नजरा स्मृती मानधना हिच्या लग्नाकडे होत्या. आपल्या संगीतमध्ये धमाकेदार डान्स करताना स्मृती मानधना दिसली. हेच नाही तर पलाश आणि स्मृती मानधना त्यांच्या संगीतमध्ये डान्स करताना दिसले. मात्र, लग्नाला अवघे काही तास शिल्लक असतानाच स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांची तब्येत खराब झाल्याचे कारण देत लग्न पुढे ढकलण्यात आले. यादरम्यान पलाश याचे काही धक्कादायक स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली.

व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉर्टनुसार, पलाश हा स्मृती मानधना हिला धोका देत होता. याबद्दलचा एक दावा देखील कोरियोग्राफरने केला. स्मृती मानधना आणि पलाश यांचे संबंध ताणल्याचेही सांगितले जात होते. हेच नाही तर अगोदरच सांगितले गेले की, 7 डिसेंबर रोजी पलाश आणि स्मृती मानधना यांचे लग्न होईल. मात्र, स्मृती मानधना हिने 7 डिसेंबर रोजीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लग्न रद्द करत असल्याचे जाहीर केले.

स्मृती मानधना हिच्या पोस्टनंतर पलाश मुच्छल यानेही एक पोस्ट शेअर केली. दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. पुढे क्रिकेटवर आणि खेळावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्टपणे स्मृती मानधना हिने म्हटले. हे लग्न करत केल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले असले तरीही तिने कुठेही उल्लेख केला नाही की, लग्न कशामुळे रद्द करत आहे. स्मृती मानधना हिच्या पोस्टमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.

पलाश मुच्छल याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझ्याबद्दल ज्या काही अफवा पसरवल्या गेल्या त्यावरून मला जज केले गेले. मला रिलेशनशीपमधून मूव्ह ऑन करायचे होते.. पलाश मुच्छल याचे हे शब्द बरेच काही सांगून जाताना दिसले. दोघांनीही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला हे स्पष्ट आहे. हा विषय माझ्यासाठी इथेच संपल्याचेही स्मृती मानधना हिने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट म्हटले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार