
मेलबर्न : टीम इंडियाने (Team India) कालची मॅच जिंकल्यापासून टीम इंडियाच्या चाहत्यांनी फटाके वाजवून दिवाळी (Diwali) साजरी केली आहे. टीम इंडियातील खेळाडू हार्दीक पांड्या आणि विराट कोहलीचं (Virat Kohli) सर्वत्र कौतुक होतं आहे. काल झालेल्या रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना कालचा अत्यंत महत्त्वाचा होता. कालची मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भविष्यवाणी व्यक्त केली आहे.
विश्वचषक सुरु होण्यापुर्वी अनेकांनी भविष्यवाणी जाहीर केली होती. अनेकांचं लक्ष आता क्रिकेटपटूच्या भविष्यवाणीकडे लागलं आहे. आज सौरव गांगुलीने जाहीर केलेल्या यादीमध्ये चार टीम सेमीफायनलमध्ये जाणार असल्याचं सांगितलं आहे.
भारत, दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या टीम सेमीफायनलमध्ये पोहोचणार असल्याचे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सांगितले आहे. या चारही टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, त्याचबरोबर फलंदाज सुद्धा आहेत.
पण टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेतील प्रमुख दावेदार असल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं. कारण टीम इंडियाकडे फलंदाज आणि गोलंदाज आहेत.