भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी द. आफ्रिकेला धक्का, डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर

| Updated on: Jun 04, 2019 | 9:17 PM

दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यात आणखी एक धक्का म्हणजे डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर झालाय.

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी द. आफ्रिकेला धक्का, डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर
Follow us on

लंडन : विश्वचषकाची सुरुवातच पराभवाने करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे स्टार गोलंदाज डेल स्टेनला विश्वचषकाला मुकावं लागणार आहे. या दुखापतीमुळेच डेल स्टेनला आयपीएलमध्येही खेळता आलं नव्हतं. शिवाय विश्वचषकातील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्येही खेळता आलं नाही. दुखापत कायम असल्याने त्याला मायदेशी परतावं लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात अनुभवी गोलंदाजांमध्ये डेल स्टेनचा समावेश आहे. त्याचं ड्रेसिंग रुममध्ये असणंही इतर गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरतं. पण दुखापतीमुळे त्याला विश्वचषकालाच मुकावं लागणार आहे. डेल स्टेनच्या नावावर वन डेमध्ये 194 विकेट्स आहेत. 2016 मध्ये डेल स्टेनने खांद्याची सर्जरी केली होती. अजूनही तो या दुखापतीचा सामना करत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा तिसरा सामना भारताविरुद्ध आहे. भारताचा हा या विश्वचषकातील पहिलाच सामना आहे. त्यामुळे बुधवारी होणारा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यंत निर्णायक असेल. साऊथेम्पटनमध्ये होणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना आणखी तयारीनिशी उतरावं लागणार आहे.

स्टेनच्या जागी वेगवान गोलंदाज ब्यूरन हँडरिक्सचा संघात समावेश करण्यात आलाय. हँडरिक्सने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय वन डे यावर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. टी-20 मध्ये हँडरिक्सची कामगिरी चांगली राहिली आहे. 10 सामन्यात 18.93 च्या सरासरीने हँडरिक्सच्या नावावर 16 विकेट्स आहेत.

भारतीय संघ :

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेशराहुल, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक, विजय शंकर

दक्षिण आफ्रिकेचा संघ

क्विंटन डी कॉक, एडन मार्करम, फफ डू प्लेसिस, डेव्हिड मिलर, रस्सी वॅन डर डस्सेन, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुक्वायो, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ब्युरेन हँडरिक्स, ड्वेन प्रेटोरियस, हाशिम आमला, तब्रेज शमसी

भारत वि. दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ. दु. 3 (भारतीय वेळेनुसार)