Kavya Maran: तारीख ठरली! ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात; होणार रजनीकांत यांची सून

Kavya Maran And प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालक काव्या मारन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आता हे दोघे कुठे विवाहबंधनात अडकणार आहे आणि तारीख काय आहे हे समोर आलं आहे.

Kavya Maran: तारीख ठरली! ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण या दिवशी अडकणार लग्नबंधनात; होणार रजनीकांत यांची सून
| Updated on: Aug 18, 2026 | 2:46 PM

Kavya Maran Aniruddh Ravichandran Wedding: प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची मालक काव्या मारन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे हाय-प्रोफाईल जोडपे भारतात नव्हे, तर परदेशात डेस्टिनेशन वेडिंगचे आयोजन करणार आहे. या संदर्भात दोन्ही कुटुंबांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

डेस्टिनेशन वेडिंग
अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या लग्नाची तारीख 10 नोव्हेंबर, 2026 असल्याचे म्हटले जात आहे. असा दावा केला जात आहे की, दोन्ही कुटुंबे दिवाळीनंतर अवघ्या दोन दिवसांनी ग्रीसमध्ये हे भव्य डेस्टिनेशन वेडिंग आयोजित करू शकतात, ज्यात केवळ काही खास पाहुणे उपस्थित असतील.

दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पण असे असूनही, या जोडप्याने आपले नाते पूर्णपणे खाजगी ठेवले आहे. त्यांनी त्यांच्यातील नाते कधीच जाहीरपणे उघड केले नाही. अनिरुद्धच्या कुटुंबातील प्रसिद्ध अभिनेते वाय.जी. महेंद्रन यांच्या एका विधानानंतर या लग्नाच्या अफवा सुरू झाल्या. त्यांच्या विधानामुळे इंटरनेटवर त्यांच्या लग्नाबद्दल आणि प्रेमकथेबद्दल अटकळ निर्माण झाली, तरीही अधिकृत विधान अद्याप आलेले नाही.

केपीटीशी बोलताना, वायजी महेंद्र यांनी आपला भाचा अनिरुद्ध रविचंद्रनचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की, मी लवकरच मोठ्या लग्नाची वाट पाहत आहे. काव्यामध्ये एका मोठ्या आयपीएल फ्रँचायझीचे व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे आणि ती अशा जबाबदाऱ्या सांभाळण्यास सक्षम आहे. ” महेंद्र यांनी काव्याच्या व्यावसायिक पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधले आणि सांगितले की, “तिला तिचे व्यावसायिक कौशल्य तिचे वडील कलानिधी मारन यांच्याकडून वारसा म्हणून मिळाले आहे.” तर अनिरुद्ध हा रजनीकांत यांचा नातेवाईक आहे. त्यामुळे काव्या ही रजनीकांत यांची सून बनणार आहे.

काव्या मारन ही सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची मुलगी असून ती आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे व्यवस्थापन करते. स्टेडियममध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देताना ती नेहमीत सक्रिय दिसते. वृत्तानुसार, तिच्या आयपीएल संघाचे एकूण मूल्य अंदाजे 18,000 कोटी रुपये आहे.

अनिरुद्ध रविचंद्रन हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि मागणी असलेल्या संगीतकारांपैकी एक आहेत. त्याने तमिळ आणि तेलुगू व्यतिरिक्त शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जवान’ साठी धमाकेदार संगीत दिले, ज्यामुळे त्याला हिंदी पट्ट्यातही प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us