इंग्लंडच्या क्रिकेट फॅनला स्टेडियममधून धक्के मारुन हाकललं

| Updated on: Jan 15, 2021 | 12:11 PM

श्रीलंका विरुद्ध इंग्लडं यांच्यात एकूण 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेचं मार्च 2020 मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे मालिका स्थगित करण्यात आली होती.

इंग्लंडच्या क्रिकेट फॅनला स्टेडियममधून धक्के मारुन हाकललं
Follow us on

गॉल : आपला देश क्रिकेटवेडा (Cricket) आहे. पण क्रिकेटवेडे भारतातच आहेत असं नाही. ते प्रत्येक देशात आहेत. कोरोनामुळे (Corona) काही महिने क्रिकेट बंद होतं. त्यानंतर क्रिकेट सामन्यांना विनाप्रेक्षक सुरुवात झाली. क्रिकेट सामना पाहण्यासाठी अनेक क्रिकेट चाहते कोणत्याही ठिकाणी जाण्यास तयार असतात. असाच एक चाहता क्रिकेट सामना पाहण्यासाठी श्रीलंकेत जाऊन पोहचला. सध्या गॉल येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (England Tour Sri Lanka) यांच्यात कसोटी सामना खेळण्यात येत आहे. हा सामना पाहायला आलेल्या इंग्लंडमधील क्रिकेटवेड्या चाहत्याला धक्के मारुन हाकलण्यात आलं आहे. (sri lanka vs england 1st test match cricket fan who went to watch the match was pushed out by the police)

नक्की काय झालं?

या क्रिकेट चाहत्याला असं धक्के मारुन का हाकलण्यात आलं, असा प्रश्न पडला असेल. यामागे कारणही तसंच आहे. कोरोनामुळे सर्व खबरदारी घेऊन हा सामना खेळण्यात येत आहे. कोरोनामुळे या सामन्याला प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी नाहीये. रॉब लेविस नावाच्या या चाहत्याने यावरही उपाय शोधून ठेवला होता. पठ्ठठ्याने हा सामना पाहण्यासाठी त्याने विशेष परवानगी घेतली. त्यानंतरही त्याला पोलिसांनी त्याला धक्के देत बाहेर काढले.

सामन्यासाठी 10 महिने वाट पाहिली

श्रीलंका विरुद्ध इंग्लडं यांच्यात एकूण 2 कसोटी सामन्यांची ही मालिका आहे. ही मालिका मार्च 2020 मध्ये नियोजित होती. ही मालिका पाहण्यासाठी हा क्रिकेट चाहता श्रीलंकेत येऊन पोहचला. मात्र तेव्हा कोरोनाचा प्रकोप वाढत होता. यामुळे ही मालिका स्थिगित करण्यात आली. पण हा पठ्ठ्या इंग्लड परतला नाही. या सामन्यासाठी त्याने श्रीलंकेतच ठिय्या मांडला. या सामन्यासाठी 10 महिने वाट पाहिली. हा सामना पाहता यावा, यासाठी त्याने विशेष परवानगी काढली. मात्र त्यानंतरही त्याला पोलिसांनी धक्के देऊन बाहेर काढण्यात आले.

…तरीही प्रयत्न सुरुच

इतक सारं घडूनही पठ्ठ्याने हार मानली नाही. “मी फार अडचणीत आहे. मी हा सामना पाहण्यासाठी 10 महिने वाट पाहिली. त्यानंतर पोलिसांनी मला बाहेर काढलं. मला सामना पाहता यावा, यासाठी मी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधणार आहे”, अशी माहिती रॉबने दिली. “आताही इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्यातील 9 दिवस बाकी आहेत. मला नक्कीच सामना पाहण्याची परवानगी मिळेल”, असा आशावाद रॉबने व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

Moeen Ali | इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीला कोरोना, श्रीलंकेत संसर्ग

PHOTO | कोरोनामुळे स्थगित झालेली कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड श्रीलंकेत दाखल

(sri lanka vs england 1st test match cricket fan who went to watch the match was pushed out by the police)