IND vs SA T20 Series : जपून वापरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्याबद्दल रहस्य टिकवून ठेवा, गौतम गंभीरला सीरीजआधी मोलाचा सल्ला

IND vs SA T20 Series : कसोटी मालिका, वनडे नंतर भारत आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. या मालिकेआधी भारताचे हेड कोच गौतम गंभीर यांना एका मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. एका खेळाडूबद्दल रहस्य टिकवून ठेवण्याचा गंभीर यांना सल्ला देण्यात आलाय.

IND vs SA T20 Series : जपून वापरा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्याबद्दल रहस्य टिकवून ठेवा, गौतम गंभीरला सीरीजआधी मोलाचा सल्ला
Gautam Gambhir
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 09, 2025 | 1:41 PM

टेस्ट सीरीजमध्ये पराभव नंतर वनडे मालिकेत विजय आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या T20 सीरीजला सुरुवात होणार आहे. T20 सीरीजला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवला मोलाचा सल्ला दिला आहे. मिस्ट्री स्पिन्र म्हणून ओळख बनवणाऱ्या वरुण चक्रवर्तीच्या वापरावरुन हा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वरुण चक्रवर्ती जास्त एक्सपोज होईल म्हणजे जास्त उघड होईल अशा पद्धतीने त्याचा वापर करु नका असा अश्विनने सावधतेचा सल्ला दिला आहे. मिस्ट्री गोलंदाज म्हणून वरुण चक्रवर्तीची ओळख आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजी समोरच्या टीमला कळता कामा नये असं अश्विन म्हणाला. कदाचित भारताला टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागू शकतो.

34 वर्षीय वरुण चक्रवर्ती आतापर्यंत भारतासाठी 29 टी 20 सामने खेळला आहे. त्यात त्याने 45 विकेट काढलेत. 5/17 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. वरुण पुढच्यावर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत-श्रीलंकेमध्ये हा वर्ल्ड कप होणार आहे. वरुण चक्रवर्ती मिस्ट्री स्पिनर आहे. अश्विनच्या मते तो आणि कुलदीप यादव आगामी वर्ल्ड कपमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात. पण अन्य टीम्सना सहजतेने त्यांची गोलंदाजी खेळण्याचा सराव होऊ नये याकडे अश्विनने लक्ष वेधलं.

तो त्याच्या गोलंदाजीच वैशिष्ट्य टिकवून

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेनंतर भारत न्यूझीलंड विरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका वर्ल्ड कपआधी रंगीत तालिम आहेत. भारताकडे विजेतेपद कायम टिकवून ठेवण्याचं आवाहन आहे. 2024 च्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवून दुसरा टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी आपण जास्त उघडू करु नये. आपण त्याची मिस्ट्री टिकवून ठेवली पाहिजे. आपण दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहोत. T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा या दोन टीम्सशी आपला सामना होऊ शकतो. वरुणची मिस्ट्री एक मोठा फॅक्टर आहे. तो अनेक वर्षांपासून खेळतोय. पण तरीही तो त्याच्या गोलंदाजीच वैशिष्ट्य टिकवून आहे असं अश्विन त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला.