IPL 2021 : आधी कर्णधारपद काढून घेतलं, नंतर संघातून वगळलं, आता थेट ‘वॉटरबॉय’, वॉर्नरसोबत हैदराबादचं नेमकं चाललंय काय?

| Updated on: May 03, 2021 | 8:01 AM

हैदराबादने पहिल्यांदा वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेतलं. काल (रविवारी) राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याला संघात स्थान दिलं नाही, याच सामन्यात तो वॉटरबॉय म्हणून संपूर्ण जगाला दिसला. (Sunrisers Hydrabad not behave good David Warner Emotional Video As A Waterboy)

IPL 2021 : आधी कर्णधारपद काढून घेतलं, नंतर संघातून वगळलं, आता थेट वॉटरबॉय, वॉर्नरसोबत हैदराबादचं नेमकं चाललंय काय?
डेव्हिड वॉर्नर
Follow us on

मुंबई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वात हैदराबादचा खराब परफॉर्मन्स होतोय, असं कारण देत ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडून (David Warner) हैदराबादने (Sunrisers Hydrabad) पहिल्यांदा कर्णधारपद काढून घेतलं. काल (रविवारी) राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याला संघात स्थान दिलं नाही, याच सामन्यात तो वॉटरबॉय म्हणून संपूर्ण जगाला दिसला. या संपूर्ण प्रकाराने क्रिकेट चाहत्यांना संताप अनावर झाला आहे. हैदराबादचं वॉर्नरसोबतचं वागणं अपमानजनक असल्याचं सांगत चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत संतापही व्यक्त केलाय. ज्या वॉर्नरमुळे हैदराबादला आयपीएलचं जेतेपद मिळालं, त्याच्यासोबतच असं वागणं हे चांगलं नाही, अशी आठवणही चाहत्यांनी करुन दिली आहे. (Sunrisers Hydrabad not behave good David Warner Emotional Video As A Waterboy)

राजस्थाविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरला अंतिम 11 मध्ये स्थान नाही…!

आयपीएलच्या 14 व्या पर्वात हैदराबादचा खराब फॉर्म सुरु आहे. त्यांचं कोणतंही प्लॅनिंग संघाला मिळवून देण्यात अपयशी ठरतंय. संघाला पहिल्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. म्हणजेच हैदराबादने केवळ एक लढत जिंकली. हैदराबाद गुणतालिकेत तळाशी आहे. अशातच हैदराबादने वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवून केन विल्यमसनकडे (Kane Williamson) कर्णधारपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरला अंतिम 11 मध्ये स्थान दिलं गेलं नाही.

राजस्थाविरुद्धच्या सामन्यात वॉर्नर थेट ‘वॉटरबॉय’

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील महत्त्वपूर्ण सामन्यात वॉर्नरला संघात स्थान दिलं गेलं नाही. सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नर बाऊंड्री लाइनवर बसला होता. एवढंच नाही तर वॉर्नर ओव्हर्सच्या मध्ये संघातील खेळाडूंसाठी पाण्याच्या बाटल्या, बॅट हेल्मेट आणि टॉवेल्स आणत होता.

वॉर्नर केवळ महान फलंदाजच नाही तर एक महान माणूस

डेव्हिड वॉर्नर एक महान फलंदाजच नाही तर एक महान माणूस देखील आहे, याची एक झलक आजच्या सामन्यात पाहायला मिळाली. वॉर्नरला स्पर्धेच्या मध्यातच कर्णधारपद सोडावं लागलं असलं तरी तो नाराज नाहीय. संघाच्या प्रत्येक निर्णयात तो हिररीने सहभागी होतोय. अंतिम 11 मध्ये नसूनही तो संघाचं मनोबल वाढवण्यात मग्न असल्याचं राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिसून आलं. सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप इमोशनल आहे.

इमोशनल व्हिडीओमध्ये काय…?

डेव्हिड वॉर्नर जेव्हा पाण्याची बाटली, बॅट, हेल्मेट, टॉवेल संघातील खेळाडूंसाठी मैदानावर आणत होता, तेव्हा एक संघातीलच एक नवोदित खेळाडू त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होता. मी जातो, असं वॉर्नरला तो म्हणत होता. परंतु वॉर्नरने दुसऱ्या खेळाडूकडे असलेलं हेम्लेट आपल्या हातात घेतलं, आणि मैदानावर जाण्यासाठी तयार झाला. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो व्हिडीओ पाहून क्रिकेट फॅन्सचं हृदय तुटतंय.

(Sunrisers Hydrabad not behave good David Warner Emotional Video As A Waterboy)

हे ही वाचा :

IPL 2021 : डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरुन उचलबांगडी, फॅन्स संतापले, हैदराबादला इतिहासाची आठवण करुन दिली!