T20 WC 2022: कोण आहे सेहर शिनवारी? जी भारताला हरवणाऱ्याशी लग्नाची ऑफर देतेय, न्यूझीलंडच्या क्रिकेटवरही झालीय फिदा

सेहर शिनवारीने या आगोदर देखील न्यूझिलंडच्या एका खेळाडूला सुध्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रपोज केला होता.

T20 WC 2022: कोण आहे सेहर शिनवारी? जी भारताला हरवणाऱ्याशी लग्नाची ऑफर देतेय, न्यूझीलंडच्या क्रिकेटवरही झालीय फिदा
actress Sehar Shinwari
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 04, 2022 | 11:03 AM

नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) आता सेमीफायनल पर्यंत जवळपास आली आहे. त्यामध्ये पाकिस्तान टीमचा (Pakistan) सुद्धा समावेश आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पाकिस्तान टीमचा पराभव झाल्यामुळे सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग टीमसाठी खडतर झाला आहे. ज्यावेळी उरलेल्या सगळ्या मॅचेस होतील, त्याचवेळी कोणती टीम सेमीफायनलमध्ये पोहोचणार हे निश्चित होईल. पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari) हीने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सेहर शिनवारी ही पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ही ऑफर तिने झिम्बाब्वेच्या नागरिकांसाठी असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे तिचा हा निर्णय झिम्बाब्वे आणि टीम इंडियाच्या मॅचनंतर होणार आहे.

तुम्हाला माहिती आहे का सेहर शिनवारी?

पाकिस्तानमधील हैदराबाद शहरात जन्म घेतलेल्या सेहर शिनवारीचा निर्णय सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. 2014 साली ‘शेर सवा शेर’ या मालिकेतून सेहर शिनवारी हीने आपल्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला तिला ही कॉमेडी मालिका मिळली. घरच्यांचा विरोध असताना सुद्धा सेहर शिनवारी हीने आपलं काम सुरु ठेवलं आणि तिथं यश मिळवलं. सध्या पाकिस्तानमध्ये तिची एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ती अधिक सक्रीय असते.

सेहर शिनवारीची नेमकी ऑफर काय आहे ?

झिम्बाब्वे टीमने पाकिस्तान टीमला पराभूत केलं आहे. तेव्हापासून पाकिस्तानच्या खेळाडूंना सोशल मीडियावर चाहत्यांनी मीम्स माध्यामातून प्रचंड ट्रोल केलं. झिम्बाब्वे पाकिस्तान टीमचा केलेला पराभव पाकिस्तान चाहत्यांच्या अधिक जिव्हारी लागला आहे. “टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या टीमने पराभूत केलं, तर मी झिम्बाब्बेच्या कोणत्याही नागरिकाशी लग्न करण्यास तयार आहे” अशी ऑफर सेहर शिनवारी हीने दिली आहे.

सेहर शिनवारीने या खेळाडूला केला होता प्रपोज

सेहर शिनवारीने या आगोदर देखील न्यूझिलंडच्या एका खेळाडूला सुध्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रपोज केला होता. विशेष म्हणजे जीमी नीशम असं त्या न्यूझिलंडच्या खेळाडू आहे. त्याला सेहर शिनवारीने माझ्या बाळाचा बाप होण्यास तयार आहे का ? असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर जीमी नीशम याने “आय लव्ह यू” असा रिप्लाय दिला होता.

हार्दीक पांड्याला सुद्धा सेहर शिनवारीने ट्विटच्या माध्यमातून रिप्लाय केला होता. “विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची पहिली पराभूत व्हा, म्हणजे तुम्हाला चांगलं काही त्यातून शिकायला मिळेल”. असा रिप्लाय तिने दिला होता.