Rinku Singh T20 WC 2026 : रिंकू सिंहच्या वडिलांच्या निधनावरुन एका पत्रकाराने इतका घाणेरडा प्रश्न विचारावा, खरचं माणुसकी शिल्लक राहिली नाही

Rinku Singh T20 WC 2026 : रिंकू सिंहच्या वडिलांचं टी20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान निधन झालं. ते कॅन्सरने पीडित होते. वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 मॅच आधी एका पत्रकाराने बॅटिंग कोच सितांशु कोटक यांना खूपच घाणेरडा प्रश्न विचारला.

Rinku Singh T20 WC 2026 : रिंकू सिंहच्या वडिलांच्या निधनावरुन एका पत्रकाराने इतका घाणेरडा प्रश्न विचारावा, खरचं माणुसकी शिल्लक राहिली नाही
Rinku Singh
| Updated on: Mar 02, 2026 | 4:09 PM

India vs West Indies : भारतीय क्रिकेट टीमने टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयाच्या आनंदात एक अशी बातमी समोर आलीय, जी खूपच निराशाजनक आहे. रिंकू सिंहच्या वडिलांच्या निधनावरुन टीम इंडियाचे फलंदाजी कोच सितांशु कोटक यांना एक प्रश्न विचारण्यात आला, हे कुठल्या अमानवीयतेपेक्षा कमी नाही. या प्रश्नानंतर सोशल मीडियावर एकच वाद सुरु झालाय. अनेक वरिष्ठ पत्रकारांनी या प्रश्नाची निंदा केलीय. हा प्रश्न रिंकू सिंहच्या वडिलांच्या निधनाशी संबंधित आहे. हे प्रकरण काय आहे?.

रिंकू सिंहच्या वडिलांचं टी20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान निधन झालं. ते कॅन्सरने पीडित होते. वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 मॅच आधी एका पत्रकाराने बॅटिंग कोच सितांशु कोटक यांना खूपच घाणेरडा प्रश्न विचारला. त्या पत्रकारने विचारलं की, रिंकू सिंहच्या वडिलांचा मृत्यू कुठल्या आशिर्वादासारखा आहे का? सितांशु कोटक हा प्रश्न ऐकून हैराण झाले. कोणीही अशा प्रकारचा अमानवीय प्रश्न कसा विचारु शकतं? अनेक मोठ्या पत्रकारांनी या प्रश्नावर टीका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पत्रकार फुटबॉल कव्हर करतो. त्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची सवय आहे. बीसीसीआय या पत्रकारावर कारवाई करु शकते.

त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही

रिंकू सिंह या टी20 वर्ल्ड कपमध्ये फार चांगली कामगिरी करु शकला नाही. यूएसए विरुद्ध त्याने 6 धावाच केल्या. नामीबिया विरुद्ध त्याच्या बॅटमधून फक्त एक रन्स आला. पाकिस्तान विरुद्ध नाबाद 11 धावा केल्या. नेदरलँड विरुद्ध नाबाद 6 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रिंकू खातही उघडू शकला नाही. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. रिंकूला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध संधी दिली नाही. झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यानंतर त्याच्या वडिलांचं निधन झालं.

Follow Us