
IND vs PAK Match T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळणार नाही, असं जाहीर करुन एकच खळबळ उडवून दिली होती. पण आता त्याच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या त्या निर्णयावरुन पलटी मारली आहे. पीसीबीने हा निर्णय पाकिस्तान सरकारच्या आदेशावरुन घेतला होता. पण आता आयसीसीसोबत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या निर्णयावरुन माघार घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पलटी मारली आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात ग्रुप मॅच होणार आहे. 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये हा सामना होणार आहे.
इंटरनॅशनल क्रिकेट काऊंन्सिलचे रिप्रेजेंटेटिव इमरान ख्वाजा आणि मुबाशिर उस्मानी अलीकडेच लाहोरला आले होते. तिथे त्यांनी पीसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ही बैठक पीसीबीकडून आयोजित करण्यात आली होती. मीटिंगमध्ये बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल सुद्धा सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. कारण हा सगळा वाद बांग्लादेश न खेळण्यावरुन झाला होता. आयसीसीकडून पाकिस्तानला मॅच न खेळल्यास संभाव्य फायनान्शिअल पेनल्टी आणि अन्य परिणामांची माहिती दिली. त्यानंतर पीसीबीची भूमिका बदलली.
कोणी-कोणी पाकिस्तानला विनंती केली?
भारत-पाकिस्तान हा क्रिकेटमधील सर्वात मोठा आणि रोमांचक सामना मानला जातो.पीसीबीच्या बदलेल्या भूमिकेमुळे क्रिकेट प्रेमींमध्ये निश्चित आनंदाची भावना आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना आता शेड्यूलनुसार होईल.भारत-पाकिस्तान सामना झाला नसता, तर प्रायोजकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं असतं. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सुद्धा हा सामना खेळण्याची पाकिस्तानला विनंती केली होती.
पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर पोस्टमध्ये काय म्हटलं?
पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर एक पोस्ट करुन भारताविरुद्ध मॅच खेळणार असल्याची घोषणा केली. मित्र देशांसोबत झालेली चर्चा लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने पाकिस्तान नॅशनल क्रिकेट टीमला 15 फेब्रुवारीला होणार्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप सामन्यासाठी मैदानात उतरण्याचे निर्देश दिले आहेत. आयसीसीसह तीन क्रिकेट बोर्डांनी पाकिस्तानला भारताविरुद्ध मॅच खेळण्याचं आवाहन केलं. यात श्रीलंकन क्रिकेट बोर्ड, अमीरात क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड होतं.