T20 World Cup: जाफरने खूप मजेदार मीम्स शेअर केले, चाहत्यांनी त्याची मजा घेतली; तुम्ही पाहिले का ?

T20 विश्वचषक सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा पाहायला मिळत आहे.

T20 World Cup: जाफरने खूप मजेदार मीम्स शेअर केले, चाहत्यांनी त्याची मजा घेतली; तुम्ही पाहिले का ?
Wasim Jaffer
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 04, 2022 | 8:14 AM

मुंबई : वसिम जाफर (Wasim Jaffer) हा त्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) अकाऊंटवरुन नेहमी चांगले मीम्स (mims) शेअर करीत असतो. काही जणांना त्याचा अर्थ पटकन लागतं नाही. ज्यांना त्याचा अर्थ समजतो, तो प्रचंड हसतो आणि ते शेअर देखील करतो. काल वसिम जाफरने असंच एक मीम्स पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेची मॅच संपल्यावनंतर सोशल मीडियावर पोस्ट केलं. ज्यांना ते मीम्स समजलं त्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला. तर ज्यांना ते समजलं नाही ते अजूनही विचार करत असतील.

T20 विश्वचषक सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ज्या टीमची किंवा खेळाडूची कामगिरी खराब होत आहे. त्यांना चाहत्यांकडून मीम्स तयार करुन ट्रोल केलं जात आहे.