कॅप्टन विराटला अॅनिवर्सरी गिफ्ट, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अॅडलेड: टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीला एक दिवस आधीच अॅनिवर्सरी गिफ्ट दिलं आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियाने अखेर अॅडलेडमध्ये तिरंगा फडकावला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा तळाचा फलंदाज पॅट कमिन्सने 121 चेंडू खेळून 28 धावा करत भारतीय गोलंदाजांना झुंजवलं. मात्र भारताच्या या झुंजीला विजयाचा टिळा लागला. भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 291 […]

कॅप्टन विराटला अॅनिवर्सरी गिफ्ट, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय!
Follow us on

अॅडलेड: टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीला एक दिवस आधीच अॅनिवर्सरी गिफ्ट दिलं आहे. विराट कोहलीच्या टीम इंडियाने अखेर अॅडलेडमध्ये तिरंगा फडकावला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा तळाचा फलंदाज पॅट कमिन्सने 121 चेंडू खेळून 28 धावा करत भारतीय गोलंदाजांना झुंजवलं. मात्र भारताच्या या झुंजीला विजयाचा टिळा लागला. भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 291 धावात गुंडाळून, पहिली कसोटी 31 धावांनी खिशात घातली. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात 250 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा 235 धावात गुंडाळून केवळ 15 धावांची आघाडी घेतली होती. मग दुसऱ्या डावात भारताने 307 धावा करत, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 322 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियन संघाला झेपलं नाही.

दुसऱ्या डावात भारताकडून बुमराह , अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 3 तर विकेट घेतल्या.

दरम्यान, आज ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवसाची सुरुवात चार बाद 104 धावांवरुन केली. मात्र ठराविक टप्प्यावर भारताने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून शॉन मार्शने सर्वाधिक 60 आणि कर्णधार टीम पेनने 41 धावा केल्या. तळाचा फलंदाज पॅट कमीन्सने 28 आणि नॅथन लायनने नाबाद 38 धावा केल्या. लायनची फलंदाजी पाहून काही क्षण भारताची धाकधूक वाढली होती. मात्र दुसऱ्या बाजूच्या हेजलवूडला अश्विनने के एल राहुलकरवी झेलबाद केलं आणि ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास केला.

संबंधित बातम्या 

ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी कोहलीला चिडवलं, रिकी पाँटिंगचीही नाराजी  

IndvsAus : भारत विजयापासून 6 पावलं दूर  

IndvsAus भारताकडे 166 धावांची आघाडी