बॅटिंगमध्ये अपयशी-काही जिंकलंही नाही, माजी सलामीवीराचा धोनीवर घणाघात

| Updated on: Jan 02, 2021 | 12:20 PM

आयसीसीने काही दिवसांपूर्वी दशकातील सर्वोत्तम संघाची निवड केली. यामध्ये एकदिवसीय आणि टी 20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीला देण्यात आली.

बॅटिंगमध्ये अपयशी-काही जिंकलंही नाही, माजी सलामीवीराचा धोनीवर घणाघात
धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni). धोनीने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसीच्या (ICC) तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिलं. धोनीने आपल्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला शिखरावर नेऊन ठेवलं. आयसीसीने नुकतेच दशकातील सर्वोत्तम संघाची आणि खेळाडूंची घोषणा केली. यामध्ये धोनीला सर्वोत्तम एकदिवसीय आणि टी 20 संघाच्या नेतृत्वपदी निवड केली. त्यामुळे धोनीवर पुन्हा एकदा चाहत्यांनी कौतुक केलं. मात्र धोनीला टी 20 टीमचा कर्णधार केल्याने एका माजी क्रिकेटपटूने आक्षेप घेतला आहे. भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने (Akash Chopra) धोनीवर घणाघात केला आहे. (team india former batsman Akash Chopra on Mahendra Singh Dhoni)

आकाश चोप्रा काय म्हणाला?

“धोनीचं टी 20 क्रिकेटमध्ये विशेष योगदान नाही. धोनीने टी 20 मध्ये फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. यानंतरही धोनीला दशकातील सर्वोत्तम संघात स्थान दिलं. म्हणून मी हैराण आहे”, असं आकाश चोप्रा म्हणाला. तसेच दशकातील सर्वोत्तम टी 20 संघात इंग्लंडचा जोस बटलर नसल्याने आकाश चोप्राने नाराजी व्यक्त केली. धोनीसह टीम इंडियावरही आकाशने हल्लाबोल केला आहे. “भारताने टी 20 मध्ये फार विशेष कामगिरी केलेली नाही”, असंही चोप्राने नमूद केलं. “टी 20 संघात धोनीऐवजी जोस बटलर हवा होता”, असं चोप्रा म्हणाला.

धोनीची टी 20 कारकिर्द

धोनीने एकूण 98 टी 20 सामने खेळले आहेत. यात धोनीने 126.13 च्या स्ट्राईक रेटने 2 अर्धशतकांसह 1 हजार 617 धावा केल्या आहेत. 56 ही धोनीची टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम टी 20 संघात एकूण 4 भारतीय खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजचे प्रत्येकी 2 खेळाडू आहेत. तसेच श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येकी 1 क्रिकेटपटूची निवड केली आहे. तसेच धोनीला आयसीसीने दशकातील खेळभावना पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

आयसीसीची टी 20 मधील सर्वोत्तम टीम : रोहित शर्मा, ख्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, ग्‍लेन मॅक्‍सवेल, एमएस धोनी, कायरॉन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा.

संबंधित बातम्या :

ICC Awards 2020 | धोनीच्या ‘त्या’ निर्णयाला ICC चा कडक सॅल्युट, दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार

(team india former batsman Akash Chopra on Mahendra Singh Dhoni)