MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्ये खेळणार

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (M. S. Dhoni has announced retirement from International Cricket)

MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, आयपीएलमध्ये खेळणार

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे अचानक निवृत्ती जाहीर करुन धक्का बसलेल्या चाहत्यांना हा थोडासा दिलासा म्हणावा लागेल. (M. S. Dhoni has announced retirement from International Cricket)

महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. त्याशिवाय या व्हिडीओला ‘मै पल दो पल का शायर हूँ,’ हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. “तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे…1929 (म्हणजे संध्याकाळी 7.30) पासून मला निवृत्त समजावे,” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.

 

 

View this post on Instagram

 

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 

महेंद्र सिंह धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झाला. 39 वर्षीय महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटला नवं आयाम दिलं. धोनीने भारताला पहिला टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि भारतीय संघाला कसोटीमध्ये अव्वलस्थान असं सर्व काही मिळवून दिलं. धोनीने तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली.

धोनीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याला प्रभावी ‘फिनिशर’ म्हटलं जातं. त्याला सर्वोत्तम विकेट-कीपरदेखील मानलं जातं.

माही आणि एमएस धोनी या नावाने ओळखतात. धोनीला ‘कॅप्टन कूल’ म्हणून संबोधले जाते.

धोनीची कसोटी सामन्यातील कारकीर्द

महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केले आहेत. त्याने कसोटी सामन्यात एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत.

धोनीने 350 एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे.

धोनी आपल्या कारकीर्दीत 98 टी-20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीने 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.

धोनीने आपल्या कारकिर्दीत एकूण 16 शतक केले आहेत. यामध्ये 10 शतक हे एकदिवसीय सामन्यांमधील आहेत. तर 6 शतक हे मालिका सामन्यांमधील आहेत.

संबंधित बातम्या : 

Rohit Sharma | ‘मुंबई इंडियन्स’मध्ये ‘त्या’ दोन खेळाडूंना परत आणू इच्छितो : रोहित शर्मा

IPL 2020 | ‘आयपीएल 2020’ला सरकारची परवानगी, 19 सप्टेंबरला पहिला सामना, अंतिम कधी?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *