
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याची बॅट तळपळली. त्याने खणखणीत शतक ठोकले. या धडाकेबाजी खेळीचे रहस्य त्याने उलगडले. या मॅरेथॉन खेळीचे यश त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला दिले. त्याच्या एका संदेशाने कशी प्रेरणा मिळाली याचे रहस्य त्याने उलगडले. काय आहे तो सीक्रेट मॅसेज, ज्याने या सामन्याचे पारडे फिरवले?
भारताला मिळाली आघाडी
टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल याने या कसोटी सामन्यात 14 चौकार आणि 2 षटकार चोपले. त्याने या दमदार खेळीच्या जोरावर सहावे कसोटी शतक ठोकले. या रण मशीनमुळे भारताने दुसऱ्या डावात साहेबांच्या देशात 373 धावांपर्यंत आघाडी आणली. आता इंग्लंड संघाला 374 धावांचे लक्ष्य गाठावे लागेल. कसोटी भारताला दबावात आणण्याचा इंग्लंड संघाचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आघाडीच्या फलंदाजांचा सूर अचानक हरवल्याने टीम इंडिया स्ट्रॅटर्जीत बदल करण्याची शक्यता आहे.
आणि त्या संदेशाने ठोकले शतक
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वी जैस्वालने रोहीत शर्मा यांच्या त्या संदेशाची चर्चा केली. “मी त्यांना स्टँड्समध्ये पाहिले. त्यांनी मला संदेश दिला की तू अजून मैदानावर खेळत राहा. ती टिकून राहा. विविध देशात कसोटी खेळण्याची आव्हान वेगवेगळी असतात. मी संघातील वरिष्ठ सहकारी रोहित भाई, विराट भाईकडून खूप काही शिकलो आहे. आता केएल राहुल आणि गिल यांच्यासोबत चर्चा करतो आणि त्यांच्या अनुभवातून कमालीचे शिकत आहे.” असे यशस्वी जैस्वाल म्हणाला.
यशस्वी जैस्वालची 118 धावांची खेळी
तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालच्या बॅटमधून धावा बाहेर आल्या. त्याची बॅट चळपली. त्याने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात आणि अखेरच्या सामन्यात शतक ठोकले. लीड्स मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्यात जैस्वालने शतक ठोकले. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात शतक ठोकले. जैस्वालने 164 चेंडूत 14 चौकार आणि दोन षटकारांसह 118 धावा काढल्या. याशिवाय आकाश दीप याने 66, रवींद्र जडेजा याने 53 तर वाशिंग्टन सुंदर याने 53 धावांची खेळी खेळली. भारताने दुसऱ्या दिवसाच्या खेळात 396 धावा करत इंग्लंडने 374 धावांचे लक्ष्य ठेवले.