Cheteshwar Pujara | टीम इंडियाचा तारणहार, द्रविडचा वारसदार , ‘The Wall 2’ चेतेश्वर पुजाराचा 33 वा वाढदिवस

| Updated on: Jan 25, 2021 | 12:19 PM

टीम इंडियाचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara 33rd birthday) 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Cheteshwar Pujara | टीम इंडियाचा तारणहार, द्रविडचा  वारसदार , The Wall 2 चेतेश्वर पुजाराचा 33 वा वाढदिवस
टीम इंडियाचा संकटमोचक चेतेश्वर पुजारा
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) संकटमोचक आणि तारणहार चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara Birthday) आज वाढदिवस. पुजाराने वयाची 33 वर्ष पूर्ण केली आहेत. पुजाराच्या वाढदिवसानिमित्ताने त्याला टीम इंडियाच्या खेळाडूंकडून तसेच क्रिकेट विश्वातून शुभेच्छा देण्यात येत आहे. पुजाराने टीम इंडियाला संकटात बाहेर काढत विजय मिळवून दिला आहे. त्याने अनेकदा निर्णायक आणि विजयी भूमिका बजावली आहे. (team india new wall cheteshwar pujara 33rd birthday)

आयसीसी, बीसीसीआयने ट्विटद्वारे पुजाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटच्या हटके शुभेच्छा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झुंजार खेळी

टीम इंडिया नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन भारतात परतली. ऑस्ट्रेलिया विरोधात बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाने ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. या विजयामध्ये पुजाराने मोलाची भूमिका बजावली. सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये त्याने अनेक चेंडू आपल्या अंगावर खाल्ले. पण अशातही त्याने कांगारुंचा सामना केला. सिडनी टेस्टमध्ये त्याने 50 आणि 77 धावांची खेळी केली. तर ब्रिस्बेनमध्ये दुसऱ्या डावात 56 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात योगदान केलं.

वडील आणि काका क्रिकेटपटू

25 जानेवारी 1988 ला गुजरातमधील राजकोटमध्ये जन्मलेल्या पुजाराला घरातूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले. त्याचे वडिल अरविंद पुजारा आणि काका बिपीन पुजारा हे रणजी स्पर्धेत खेळले आहेत. या दोघांनी सौराष्ट्रचं प्रतिनिधित्व केलं आहे. या क्रिकेटमय वातावरणाचा पुजाराला फायदा झाला.

द्रविडनंतर टीम इंडियाचा हुकमी एक्का

द वॉल अर्थात राहुल द्रविड 2012 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. द्रविड साधारणपणे तिसऱ्या क्रमांकावर खेळायचा. द्रविडच्या निवृत्तीनंतर पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. या 2012 मध्येच न्यूझीलंडविरोधात त्याने शतक ठोकलं. यासह त्याने द्रविडचा वारसदार असल्याचं सिद्ध करुन दाखवलं. पुजारा तेव्हापासून टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावत आला आहे.

पुजाराची कसोटी कारकिर्द

पुजाराने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरुमध्ये कसोटी पदार्पण केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत पुजाराने एकूण 81 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. यामध्ये त्याने 3 द्विशतक, 18 शतक आणि 28 अर्धशतकांसह 6 हजार 111 धावा केल्या आहेत. 206 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

संबंधित बातम्या :

बॉल लागले, हेल्मेट फुटलं, खाली कोसळला, पण बॅटिंग सोडली नाही, पुजाराच्या बॅटिंगवर ‘बापमाणूस’ खूश!

ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय कसा मिळवायचा, हे आम्हाला चांगलंच माहितीय : चेतेश्वर पुजारा

(team india new wall cheteshwar pujara 33rd birthday)