IND vs ZIM: बीसीसीआयने तीन खेळाडूंचा गेम केला, फॉर्मात असूनही झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेतून वगळलं; एक तर गंभीरचाच लाडका आणि दोन…
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. आता ज्या खेळाडूंना संधी मिळाली आहे त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. यातील दोन सामने पार पडले आहेत. पहिला सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. आता आज तिसरा सामना रंगणार आहे. आता या मालिकेनंतर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 23 जुलैपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी संघाची घोषणा केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. यश ठाकूर, अशोक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. दरम्यान, काही महत्त्वाच्या खेळाडूंना निवड प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे, त्यापैकी सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे संजू सॅमसन. तर आणखी दोन खेळाडू या संघात आपले स्तान निर्माण करण्याच्या शर्यतीत आहे.
टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट) संजू सॅमसनला झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन आणि इंग्लंडविरुद्धच्या एका टी-20 सामन्यातील त्याच्या खराब कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आला. हे निश्चितच आश्चर्यकारक आहे, कारण याने 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये एकहाती 97, 89 आणि 89 धावा करून भारताला ट्रॉफी जिंकण्यास मदत केली होती. वृत्तानुसार, संजू सॅमसनलाही आशियाई खेळांच्या संघातून वगळले जाऊ शकते.
रजत पाटीदार सध्याच्या सर्वात प्रभावी टी20 फलंदाजांपैकी एक आहे. मधल्या षटकांमध्ये आपल्या खेळीला गती देण्याची त्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. तो विशेषतः फिरकी गोलंदाजांविरुद्ध प्रभावी आहे. आपल्या कर्णधारपदाखाली, रजतने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला सलग दोन आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहेत. इतकेच नाही, तर 2025 आणि 2026 मध्ये त्याने अनुक्रमे 312 आणि 501 धावा केल्या. या आकडेवारीनुसार, तो झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळण्यास पात्र होता.
कृणाल पांड्याने गेल्या दोन आयपीएल हंगामात दाखवून दिले आहे की तोही कोणापेक्षा कमी नाही. आरसीबीमध्ये सामील झाल्यापासून त्याचा खेळ अधिक सुधारलेला पाहायला मिळाला आहे. फिरकी गोलंदाज असूनही, तो आपल्या घातक बाऊन्सरने फलंदाजांना बॅकफूटवर ठेवतो. गरज पडल्यास फलंदाजीने योगदान देण्यासही तो मागे हटत नाही. 2025 आणि 2026 मध्ये, कृणालने अनुक्रमे 17 बळी घेतले. या कामगिरी आणि अनुभवाच्या आधारावर, झिम्बाब्वेविरुद्ध पांड्याची निवड होणे योग्यच होते.