AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले

भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका सुरु होणार आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. आता सरावा दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका गोष्टी ने लक्षवेधून घेतले आहे.

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले
ind vs zim
| Updated on: Jul 21, 2026 | 12:42 PM
Share

भारतआणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका आणि वनडे मालिका खेळवली गेली. एकही टी-20 सामना तर भारतीय संघाला जिंकता आला नाही, आणि फक्त एकच वनडे सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. भारतीय संघ सध्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेमध्ये आहे. पहिला सामना 23 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल. या मालिकेसाठी अनेक भारतीय खेळाडू झिम्बाब्वेमध्ये दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. आता भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत मालिका जिंकता यावी य़ा इच्छेनेच मैदानात उतरतील.

कर्णधार श्रेयस अय्यरसह, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत नुकतेच खेळलेले काही खेळाडूही लवकरच संघात सामील होतील. हरारे स्पोर्ट्स क्लबमधील सराव सत्रात भारतीय खेळाडू जोमाने सराव करताना पाहायला मिळाले. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. खेळाडूंनी त्यांच्या देखरेखीखाली सराव केला. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे दोन तरुण खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींचा सराव करताना दिसले. रिंकू सिंगनेही त्यांच्यासोबत गोलंदाजीचा सराव केला. प्रशिक्षक लक्ष्मण यांनी क्षेत्ररक्षणावर विशेष लक्ष दिले आणि झेल घेण्याच्या सरावात खेळाडूंना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केले. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया पेजवर या सत्राचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची अलीकडील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. टीम इंडियाने यापूर्वी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळल्या आहेत. इंग्लंडमध्ये टीम इंडियाने पाच टी-20 सामने खेळले, त्यापैकी चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. एक सामना पावसामुळे रद्द झाला. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही भारतीय संघ 2-0 ने पराभूत झाला. गेल्या सात सामन्यांमध्ये टीम इंडियाला सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला असून, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

आयर्लंड मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरची भारतीय टी-20 संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय संघ टी-20 मध्ये आपली चांगली कामगिरी कायम ठेवेल अशी आशा होती, पण तसे घडले नाही. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे, भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यावर ही पराभवाची मालिका संपवण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतही पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर असेल.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?