T20 World Cup:’प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे…’ हरल्यानंतर भारतीय खेळाडूची सोशल मीडियावर पोस्ट

काल टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर तो खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे.

T20 World Cup:प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे... हरल्यानंतर भारतीय खेळाडूची सोशल मीडियावर पोस्ट
टीम इंडियातील खेळाडूंच्या सोशल मीडियावर भावनिक पोस्ट, पाहा कोणी काय लिहिलंय
Image Credit source: facebook
| Updated on: Nov 11, 2022 | 3:23 PM

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाची (Team India) कामगिरी चांगली राहिली होती. सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्याने खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जोरदार टीका झाली आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली नाही, अशा खेळाडूंना काढून टाका अशा सुचना चाहत्यांनी बीसीसीआयकडे केल्या आहेत.

काल टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर तो खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे. आज काही खेळाडू मायदेशी परतणार आहेत. तर काही खेळाडू उद्या मायदेशी परतणार आहेत. हार्दीक पांड्यासह अनेक खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत.

हार्दीक पांड्याने ‘प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. कालच्या मॅचमध्ये हार्दीक पांड्याने तुफानी बॅटिंग केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या अधिक झाली होती.

विराट कोहलीने सोशल मीडियावर आम्ही आमचं तुटलेलं काळीज घेऊन ऑस्ट्रेलियातून जात आहोत, तसेच मैदानात उपस्थित राहिलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे आभार मानतो, अशी पोस्ट लिहिली आहे. केएल राहूल याने फक्त एक इमोशनल इमोजी आणि फोटो शेअर केला आहे.

आम्ही विश्वचषक स्पर्धेत चांगली खेळी केली, टीम आणि इतर सदस्यांनी चांगलं सहकार्य केलं. तसेच या पुढे आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करु असंही सुर्यकुमार यादवने सोशल मीडियावर लिहिलं आहे.