भारतीय संघ ‘या’ संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने नकार कळवण्यामागचे कारण काय?

भारतीय संघाचे 2026 मधील वेळापत्रक खूप व्यस्त आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा प्रस्ताव दिला होता, परंतु तो फेटाळण्यात आला आहे. यामागील कारण आता समोर आले आहे.

भारतीय संघ या संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने नकार कळवण्यामागचे कारण काय?
team india
| Updated on: Jun 28, 2026 | 2:31 PM

भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. जिथे दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. ज्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळती. यातील एक सामना पारही पडला आहे ज्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. तर दुसरा सामना आज रंगणार आहे. इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहे तर तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. पण आता या दरमन्यान बीसीसीआयने श्रीलंका बोर्डाची विनंती रद्द केली आहे. श्रीलंका बोर्डाने भारतीय संघासोबत मालिका खेळण्याचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर राखला होता पण बीसीसीआयने तो मान्य केला नाही.

भारतीय संघ ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. श्रीलंका क्रिकेटने या दौऱ्यावर तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याचा प्रस्तावही दिला होता, परंतु आता आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने तो फेटाळला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करण्यास नकार देण्यामागील कारणही समोर आले आहे.

श्रीलंका क्रिकेटने दौरा वाढवून टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारताचा सहभाग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल, अशी श्रीलंकाला बोर्डाला आशा होती. श्रीलंका दौऱ्यानंतर भारताच्या पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यापूर्वी सुमारे दोन आठवड्यांचे अंतर आहे. याच कारणास्तव, श्रीलंका क्रिकेटने तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता.

स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक आणि खेळाडूंवरील कामाचा ताण यामुळे बीसीसीआयने हा प्रस्ताव फेटाळला. अहवालात म्हटले आहे की, “सूत्रांनी पुष्टी केली आहे की दोन्ही मंडळांमधील चर्चेदरम्यान, बीसीसीआयने कळवले की ते या प्रस्तावावर पुढे जाऊ शकणार नाहीत. भारतीय मंडळाने भविष्यात अशी मालिका आयोजित करण्याची शक्यता नाकारलेली नाही.”

सध्या, भारतीय संघ केवळ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेचा दौरा करणार आहे. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचे नियोजन आहे. वृत्तानुसार, एक सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आणि एक एसएससी मैदानावर खेळला जाऊ शकतो.

Follow Us