AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तास 38 मिनिटांचा चित्रपट; सुरुवातीला फ्लॉप, पण नंतर ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर

'बाहुबली'च्या प्रदर्शनाचा दिवस ठरला होता राजामौलींसाठी सर्वात मोठा संघर्ष; 70 कोटींचे कर्ज, 'करिअर संपलं' अशी होती भीती. पण रिलीजनंतर चित्रपटाने रचला इतिहास.

2 तास 38 मिनिटांचा चित्रपट; सुरुवातीला फ्लॉप, पण नंतर ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 28, 2026 | 2:51 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ फ्रँचायझीने केवळ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला नाही तर भारतीय सिनेमाचा दर्जाही उंचावला. जगभरात 1,000 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट फ्रँचायझी ठरला. मात्र, आज ज्या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले, त्याच्या प्रदर्शनाच्या दिवशी मात्र निर्माते, कलाकार आणि स्वतः राजामौली यांच्यावर प्रचंड मानसिक ताण होता.

नेटफ्लिक्सवरील ‘बाहुबली: द टॉर्चबेअरर’ या माहितीपटात राजामौली आणि निर्माते शोबू यार्लगड्डा यांनी त्या काळातील संघर्ष उलगडून सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली तेव्हा कोणतेही निश्चित बजेट नव्हते. प्रत्येक दिवसाच्या चित्रीकरणासाठी निधी उभारणे ही मोठी कसरत होती.

70 कोटींचे कर्ज

मात्र, ‘बाहुबली: द बिगिनिंग’ प्रदर्शित होण्याच्या दिवशी परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. शोबू यार्लगड्डा यांनी सांगितले की, चित्रपट प्रदर्शित होत असतानाही त्यांच्या कंपनीवर तब्बल 70 कोटींचे कर्ज होते. खर्च आणि मिळालेल्या उत्पन्नाचा हिशोब केला असता ते अजूनही मोठ्या तोट्यात होते.

राजामौली यांनी सांगितले की, हिंदी, अमेरिका, गल्फ देश आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत होता. मात्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुरुवातीला आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया पाहून ते हादरले. सोशल मीडियावर शिवलिंगाऐवजी झंडू बाम दाखवणारे व्यंगचित्र व्हायरल झाले होते. त्यामुळे चित्रपट अपयशी ठरणार अशी भीती सर्वांनाच वाटू लागली.

रिलीजनंतर रचला इतिहास

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली: द बिगिनिंग’मध्ये प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, सत्यराज आणि नासर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स, दमदार अभिनय आणि राजामौली यांच्या दिग्दर्शनामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला.

यानंतर 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ हा त्याहूनही मोठा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने जगभरात सुमारे 1,788 कोटींची कमाई करत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली आणि आजही तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक मानला जातो.

‘बाहुबली’च्या यशामागे केवळ भव्य निर्मिती नव्हती, तर अनेक वर्षांचा संघर्ष, आर्थिक जोखीम आणि संपूर्ण टीमचा प्रचंड आत्मविश्वास दडलेला होता. प्रदर्शनाच्या दिवशी अपयशाची भीती मनात असलेल्या या चित्रपटाने पुढे भारतीय सिनेमाचा चेहरामोहराच बदलून टाकला.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना